शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

इच्छाशक्तीच्या जोरावर धावलो खडतर शर्यत - नीलेश भांडारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:53 IST

८७ किमीची डर्बन कॉम्रेड्स मॅरेथॉन केली पूर्ण

जळगाव : इच्छाशक्तीच्या जोरावर डर्बन येथे आयोजित केली जाणारी ८७ किमीची कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केली. जर प्रत्येकाने ठरवले तर अशक्य काहीच नाही, हे प्रत्येकाला शक्य आहे, असे प्रतिपादन जळगावचे धावपटू आणि नुकतीच डर्बन येथील कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करणारे नीलेश भांडारकर यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील लोकमत शहर कार्यालयाला नीलेश भांडारकर यांनी आज भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, जळगाव रनर्सचे डॉ. रवी हिरानी, विक्रांत सराफ उपस्थित होते.भांडारकर यांनी आपला सराव आणि डाएट याबाबत माहिती देतांना सांगितले की, पुण्याचे गिर्यारोहक किशोर धनकुडे यांच्यामुळे डर्बनची ही जुनी आणि सर्वात कठीण मॅरेथॉन पूर्ण करण्याची कल्पना मनात आली. त्यानंतर यासाठी प्रयत्न सुरू झाले. टेकड्यांच्या रांगांमधून होणाऱ्या या शर्यतीचा सराव जळगावमध्ये होणे शक्य नव्हते.मात्र तरीही सकाळी पाच ते आठ यावेळेत मोहाडी रोड, विद्यापीठ परिसर, कोल्हे हिल्स या भागात सराव केला. अधिक सरावासाठी पुणे ते लवासा, लोणावळा ते अ‍ॅम्बी व्हॅली या डोंगरी भागात पुण्यातील मित्रांसह गेलो. तसेच कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे देशभरातील धावपटू हे याच भागात सराव करतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला.या प्रवासाची सुरुवात कशी झाली. याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी माझे वजन १३६ किलो होते. त्यामुळे शारीरिक समस्या उद्भवत होत्या.मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि जळगाव रनर्स ग्रुपची साथ मिळाली. हळूहळू दहा किलोमीटर धावायला लागलो. नंतर ४२ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण धावलो. त्यानंतर अल्ट्रा रनसाठी प्रयत्न केले. त्यातील एक मोठी शर्यत कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केली, असे त्यांनी सांगितले.ही शर्यत पूर्ण करताना कुटुंबावर आणि व्यवसायावर त्याचा कसा परिणाम होतो, यावर बोलताना भांडारकर यांनी सांगितले की, याचे सकारात्मक परिणाम जास्त दिसून आले.आता माझे पूर्ण कुटुंबच वेगवेगळ्या धावण्याच्या शर्यतीत सहभागी होते. तसेच दिवसभर काम करताना उत्साहदेखील जाणवतो. कुटुंबाने याबाबतीत सहकार्य केले. त्यांच्याशिवाय हा मोठा पल्ला गाठता आलाच नसता’, असेही ते भांडारकर म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव