ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.1- शेतक:यांनी पीककर्ज मिळावे, एटीएम कार्डद्वारे पुरेसे पैसे द्यावेत, तसेच शेतक:यांचा 7/12 कोरा करावा आदी मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे गुरुवारी धुळे रस्त्यावरील बाजार समितीसमोर सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी 10 जणांना अटक करून, त्यांची सुटका केली.
येथील जिल्हा बँकेच्या कर्ज शाखेतून शेतक:यांना पीक कर्ज दिले जात नाही. तसेच किसान क्रेडिट कार्डचे देखील वितरण संथ गतीने सुरू आहे. किसान क्रेडिट कार्ड द्वारे एटीएम मधून पूर्ण पैसे मिळत नाही. त्यामुळे शेतक:यांना एटीएमकार्ड पुन्हा पुन्हा वापरून पैसे काढावे लागत आहेत. तसेच बॅँकेतर्फे कमिशन कापले जात आहे. त्यामुळे शेतक:यांना आर्थिक भुदर्ंड सहन करावा लागतोय. शेतक:यांना पीककर्ज मिळावे, एटीएममधून पुरेसे पैसे मिळावे, शेतकरी संपाच्या पाश्र्वभूमिवर शेतक:यांचा 7/12 कोरा करण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे आज धुळे रस्त्यावर जवळपास अर्धातास रास्तारोको करण्यात आले. त्याचे नेतृत्व शिवाजी दौलत पाटील यांनी केले. यावेळी जवळपास 150 शेतकरी उपस्थित होते. पोलिसांनी दहा शेतक:यांना अटक करून त्यांची नंतर सुटका केली.
यावेळी मधुकर पाटील, दत्तात्रेय पाटील, शिवाजी चिंतामण पाटील, निंबा पाटील, काँग्रेसचे गोकुळ बोरसे, कॉ. लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.