फोटो...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : धावत आलेल्या म्हशीने रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षा उलटून प्रवासी बाहेर फेकले गेले. सिंधूबाई सुखदेव पवार (७०, रा. कुसुंबा, ता.जळगाव) या रिक्षाच्या खाली दाबल्या गेल्या. रिक्षाचालक जितेंद्र सुर्वे यांच्याही डोक्याला दुखापत झाली. हा अपघात सोमवारी दुपारी बारा वाजता शिरसोली रस्त्यावर झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र सुर्वे हे स्वतःची रिक्षा ( क्र. एमएच १९ व्ही ८१२९) घेऊन चाळीसगाव येथून जळगाव शहरात येत होते. शिरसोली येथून सिंधूबाई सुखदेव पवार या वृद्धा रिक्षात बसल्या. आधीदेखील रिक्षात चार ते पाच प्रवासी होते. श्रीकृष्ण लॉन्स ओलांडल्यानंतर काही अंतरावर समोरून म्हशींचा धावतच आल्या. त्यात एक म्हैस रिक्षावर धडकली. त्यामुळे रिक्षा पलटी झाली. यावेळी रिक्षात बसलेला सिंधूबाई यांच्या अंगावर रिक्षा पकडली. त्यांच्या पायाला व पाठीला दुखापत झाली आहे. रिक्षाचालक सुर्वे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी धाव घेऊन सिंधूबाई यांच्या अंगावरील रिक्षा बाजूला केली. नशीब बलवत्तर म्हणून सिंधूबाई बचावलेल्या. त्या शिरसोली येथे नातीच्या भेटीसाठी गेल्या होत्या. सोमवारी कुसुंबा येथे घरी जात असताना हा अपघात झाला. यात रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.