शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे मुख्य सचिव घेणार जळगाव जिल्ह्यातील भूसंपादनाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:53 IST

जळगाव : रेल्वेतर्फे सुरू असलेल्या जळगाव -मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता हे घेणार ...

जळगाव : रेल्वेतर्फे सुरू असलेल्या जळगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता हे घेणार असून यासाठी मंगळवार, २४ रोजी ते व्हीसीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत. या कामासाठी रेल्वेला जमिनी द्यायला पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील शेतकºयांनी विरोध दर्शविला असून त्यासंदर्भात १९ रोजी ‘लोकमत’ने ‘भूसंपादनाला पाचोरा, चाळीसगाव तालुक्यातील शेतकºयांचा विरोध’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर ही व्हीसी होत आहे.जळगाव ते मनमाड दरम्यान तिसºया रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलो मीटरच्या कामाला यंदा मे महिन्यात सुरुवात केली आहे . मात्र, या साडेअकरा किलो मीटरच्या मार्गावर ज्या शेतकºयांच्या जमिनी येत आहेत. त्या शेतकºयांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी भूसंपादनाला विरोध दर्शविला आहे. तसेच पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील रेल्वे मार्गालगत असलेल्या शेतकºयानी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार पाचोरा व चाळीसगाव येथील प्रातांधिकाºयांनी या शेतकºयांसोबत चर्चादेखील केली. मात्र, यातून अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. परिणामी रेल्वेच्या हद्दीतच तिसºया लाईनचे काम सुरु असून इतर ठिकाणचे काम रखडले आहे. तसेच दुसरीकडे भादली ते जळगाव या तिसºया रेल्वे मार्गाच्या कामासाठी तरसोद व असोदा येथील बायायतदार व निम बागायतदार शेतकºयांच्या जमिनीला ज्याप्रमाणे भाव दिला आहे त्याप्रमाणे आमच्यादेखील जमिनीला भाव द्यावा, अशी मागणी येथील शेतकरी बांधवांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यावर रेल्वेच्या अधिकाºयांनी महामार्गालगत या जमिनी असल्यामुळे येथील जमिनींना भाव द्यावा लागला असल्याचे शेतकºयांना कळविले आहे. तर शेतकºयांनीही तरसोद-असोदा येथील शेतकºयांप्रमाणे आमच्या जमिनींना मोबदला दिल्यावरच तिसºया मार्गासाठी रेल्वेला जमिनी देणार असल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे.जिल्ह्यात रेल्वेच्या कामासाठी भूसंपादनाचे असे प्रश्न असल्याने ते सोडविण्यासाठी गेल्या आठवड्यात राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी व भुसावळातील रेल्वे अधिकाºयांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. या बैठकीत मुख्य सचिवांनी सध्याच्या बाजार भावानुसार शेतकºयांच्या जमिनी खरेदी करा, शेतकºयांच्या मागणी संदर्भात काही तडजोड करा, तडजोडी नंतरही काही प्रश्न सुटत नसेल तर भूसंपादन कायद्यानुसार या जमिनी ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनाकेल्याहोत्या.त्यानंतर आता पुन्हा २४ रोजी मुख्य सचिव मेहता हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्याकडून माहिती घेणार आहे. त्यासाठी संबंधित प्रांताधिकाºयांना बोलविण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव