शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचा-यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मदत करणार - सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 13:15 IST

महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी मेळाव्यात मांडल्या विविध मागण्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  महसूल विभाग हा गोरगरिबांची सेवा करणारा विभाग असून शासनातील अतिशय महत्त्वाच्या असणा:या महसूल कर्मचा-यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही सहकार राज्यमंत्री  गुलाबराव पाटील यांनी दिली. अल्पबचत भवनमध्ये जळगाव जिल्हा महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने  राज्यस्तरीय कार्यकारीणी मेळावा व आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री  पाटील उपस्थित होते, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, तहसीलदार अमोल निकम, राज्य कार्यकारीणीचे डी. एम. अडकमोल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

लोकसेवक असल्याची जाण आवश्यक -  जिल्हाधिकारी

लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करीत असताना आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना आपण सर्वांनी मनामध्ये ठेवून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.  प्रत्येकाच्या मागण्या वेगवेगळया असतात, त्या सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थिताना केले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनीही  मनोगत व्यक्त केले.  

संघटनेने केल्या विविध मागण्या यावेळी संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त कर्मचारी, वैद्यकीय कारणास्ताव अपात्र असणारे कर्मचारी व स्वेच्छा निवृत्ती घेणारे कर्मचारी यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अनुकंपा तत्वावरीलसेवा भरती विनाअट करावी. गट ड संवर्गातील इतर कर्मचा:यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने 14 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयातील अट क्र. 5 रद्द करणे, 2005पासूनची चतुर्थश्रेणी कर्मचारी अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुन्या पध्दतीने चालू करावी, कोतवालांना पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्यांचे निवेदन पदाधिका:यांनी राज्यमंत्री  पाटील यांना दिले. प्रास्ताविक अध्यक्ष डी. एम. अडकमोल यांनी केले.  या कार्यक्रमास राज्य कार्यकारीणीचे व जिल्हा कार्यकारीणीचे सर्व पदाधिकारी, तसेच महसूल विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.