शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचा संप दुस-या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:56 IST

कामे खोळंबली

जळगाव : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना ६ वर्षांचा कालावधी होवूनही त्याबाबत शासनाकडून अद्यापपर्यंत कोणताही शासननिर्णय घेण्यात न आल्याने जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत संप पुकारण्यात आला असून दुसºया दिवशीही शुक्रवारी हा संप सुरूच होता. यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत. यामध्ये कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत आहेत. या संपामुळे जिल्हाभरात महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम होण्यासह कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांना ६ वर्षे होऊनही त्याबाबबत शासनाकडून अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच याबाबत त्वरीत कार्यवाही होत नसल्याने संघटनेतर्फे वेगवेगळे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. त्यानुसार या संपास ५ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली.या बेमुदत संपात जिल्ह्यातील सर्व १५ तालुके, सात उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयामधील पदोन्नत नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक सहभागी झालेले आहेत.या आंदोलनाला वाहनचालक संघटना, तलाठी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शैलेंदसिंह परदेशी यांनी सांगितले.या आहेत मागण्या...महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे, अव्वल कारकून वर्ग-३च्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, आकृती बंधात दांगट समिती अहवालानुसार पदे मंजूर करणे, इतर विभागाचे कामासाठी (संजय गांधी निराधार योजना, रोहयो, गौण खनिज, जातप्रमाणपत्र इत्यादी) नव्याने आकृतीबंध तयार करणे, एमपीएससी परीक्षेत नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी पदासाठी महसूल कर्मचाºयांसाठी ५ टक्के जागा आरक्षित ठेवणे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ टक्के वरुन २० टक्के करणे.

टॅग्स :Jalgaonजळगाव