शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचे प्रकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:22 IST

ईदुल फित्र हा आनंदाचा दिवस. सर्व मुस्लिम बांधव आनंदी व उत्साही आहेत. जणू काही त्यांना महिन्याभराच्या मेहनतीचा मोबदला मिळणार ...

ईदुल फित्र हा आनंदाचा दिवस. सर्व मुस्लिम बांधव आनंदी व उत्साही आहेत. जणू काही त्यांना महिन्याभराच्या मेहनतीचा मोबदला मिळणार आहे.ईदुल फित्र इस्लाम धर्माचा एक महत्वपूर्ण सण आहे. हा एक जागतिक आनंदोत्सव आहे. मुस्लीमांचे प्रमुख दोन सण आहेत. ईदुल फित्र आणि ईदुल अजहा म्हणजे रमजान ईद आणि बकरी ईद. जागतिक प्रत्येक सभ्यतेमध्ये उत्सवांना मोलाचे स्थान आहे. सामाजिक उत्सव साजरे करणे तसेच एकत्रित येऊन प्रकटीकरण करणे ही मानवाची प्रवृत्ती आहे.ईदुल फित्र म्हणजे फक्त आनंद उत्सव साजरे करणे नसून मानवाच्या वास्तविक जीवनासाठी अनेक सुप्त गुण आहेत.आपल्या ईश्वराच्या उपासनेचा आदेश आहे. तीस दिवसीय उपासना व ईश्वर स्मरणाच्या अल्लाहकडून मान्यतेचा दिवस आहे. पण या मान्यतेवर अहंकार दाखवायची परवानगी नाही. ईश्वरासमोर नतमस्तक होऊन नेहमीसाठी उपासना आणि आदर अंमलात आणण्याचा दिवस आहे.जेव्हा कोणी व्यक्ती एका मोठ्या जबाबदारीस पार पाडतो व त्यास आनंद होतो हा मानवाचा स्वभाव धर्म आहे. जेव्हा मुस्लिम लोक रमजान महिन्यातील रोजांचे कर्तव्यपूर्ण करतात तेव्हा त्यांना आत्मसमाधान लाभते.या आनंदाचे प्रकटीकरण म्हणजे ईदुल फित्र. इस्लामचे प्रेषीत मोहम्मद पैंगबर (स.अ.स.) यांच्या मतानुसार रोजेदारासाठी दोन प्रकारचे आनंद आहेत. एक रोजे या कर्तव्यास पूर्र्ण करून ईदचा आनंद तर दुसरा रोजे पूर्ण केल्याबद्दल अल्लाह कडून मिळणाऱ्या बक्षीसाचा आनंद.ईदच्या रात्रीला उपासनेची रात्र संबोधले आहे आणि ह्या रात्री (चांदरात) इबादत करणाऱ्यांना मोक्ष आणि क्षमा याची शास्वती आहे. आपल्या आनंदाचा स्वीकार आपल्या ईश्वरासमोर आपली मान नमवून केला जातो.- काझी मुजम्मिलोद्दीन नदवी, डिपार्टमेन्ट आॅफ इस्लामिक स्टडीज, इकरा एच.जे.थीम कॉलेज, मेहरूण, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव