या दोघांनी पत्नीस सापडलेले रोख रकमेचे पाकीट स्वतः संबधित व्यक्तीपर्यंत स्वतः पोहोचविले. विशेष म्हणजे, पाकीट परत केल्यानंतर त्या मोबदल्यात मिळत असलेले बक्षीसही नाकारून पैशांची नसली, तरी आपली मनाची श्रीमंती त्यांनी सिद्ध केली आहे. सुनीता रविकांत महाजन व रविकांत छोटू महाजन रा.अमलेश्वर नगर माळीवाडा असे या प्रामाणिक दाम्पत्यांचे नाव असून, दोन्ही पती व पत्नी दररोज डोक्यावर मठ घेत, शहरात फेरी करून विक्रीचा व्यवसाय करतात, तीन दिवसांपूर्वी अमळनेर शहरातील पॅथॉलॉजिस्ट शरद शेवाळे हे सकाळीच दुचाकीने आपल्या लॅबकडे जात असताना, विद्या विहार कॉलनीजवळ त्यांच्या खिशातील पैशांचे पाकीट नकळत खाली पडले, सदरचे पाकीट मठ विक्रीसाठी जात असलेल्या सुनीता महाजन यांच्या नजरेस पडले, त्यांनी ते उचलून थोडा वेळ त्याच ठिकाणी थांबून कुणाचे पडलेय का, यासाठी वाट पाहिली. मात्र, २५ मिनिटे कुणीच न आल्याने त्यांनी ते पाकीट स्वतःजवळ ठेऊन मठ विक्री करून घरी गेल्या, इकडे शेवाळे यांना पाकीट गेल्याचे समजल्यावर तेही परेशान झाले होते,त्यांनी शोधही घेतला पण मिळाले नाही,पाकिटात ५ते ६ हजार रोकड शिवाय दोन एटीएम,ड्रायव्हिंग लायसन्स व्यतिरिक्त इतर महत्वाची कागदपत्रे होती. त्यांनी फोन करून संबंधीतास ही माहिती कळवून पाकीट परत केले. त्यांचे कौतुक होत आहे.
राेख रकमेचे सापडलेले पाकीट केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST