मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगरविधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अॅड.रवींद्र पाटील यांनी धक्कादायक माघार घेतली आहे. पक्ष आदेश असल्याने माघार घेण्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या माघारीमुळे विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलले असून, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांची आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या भाजप उमेदवार रोहिनी खडसे यांच्यात सरळ लढत रंगणार आहे.दुसरीकडे पक्षाकडून माघारीचे आदेश आल्याने स्वत: रवींद्र पाटील हे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठविणार असल्याची भूमिका मांडली, तर राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी विनोद तराळ यांनी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.
मुक्ताईनगरात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 15:44 IST
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अॅड.रवींद्र पाटील यांनी धक्कादायक माघार घेतली आहे.
मुक्ताईनगरात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराची माघार
ठळक मुद्देपक्षादेश असल्याने घेतली माघारआता शिवसेना बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील आणि भाजप उमेदवार रोहिणी खडसे यांच्यात रंगणार लढतरवींद्र पाटील यांचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाराष्ट्रवादीचे इतर पदाधिकारीही देणार राजीनामे