शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

यंत्रणांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 21:11 IST

जिल्हाधिकारी : प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी आढावा बैठक

जळगाव - प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. या समारंभासाठी सर्व संबंधित यंत्रणांवर सोपविलेली जबाबदारी सर्वांनी चोखपणे पार पाडावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.प्रजासत्ताक दिन समारंभाची पूर्वतयारी आढावा बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, प्रसाद मते, सुनील सुर्यवंशी, योगेश पाटील, मिलींद दिक्षित, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, विजयसिंग परदेशी, सुरेश थोरात, संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती.समारंभास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असून संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पाडला जाईल याची कटाक्षाने काळजी घ्यावी. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने विविध स्पर्धाचे, वृक्षारोपण, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वेबिनारचे आयोजन करावे. मात्र प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळांचे आयोजन करण्यात येवू नये. यादिवशी सकाळी ८.३० ते १० वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये, अशा, सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. एखाद्या संस्थेला अथवा कार्यालयाला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी ८.३० वाजेपूर्वी किंवा १० वाजेनंतर करावा. मुख्य शासकीय समारंभ नीटनेटका होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडेल याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी बैठकीत दिल्या.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव