शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘जलशक्ती’चा निधी खर्च करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:21 IST

जलव्यवस्थापन समिती बैठक : मंजूर ७ कोटी ८९ लाखांचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा

जळगाव : जलशक्ती अभियानाचा निधी खर्च करण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने तसेच हे काम लघु सिंचन विभागाशीच निगडीत असल्याने जलशक्तीचा निधी खर्च करण्याबाबत जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठराव करण्यात आला. त्यामुळे आता ‘जलशक्ती’साठी मंजूर ७ कोटी ८९ लाखांचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बुधवार, २९ रोजी जलव्यवस्थापन समितीची बैठक जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात हा ठराव करण्यात आला आहे. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, पवन सोनवणे, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानांतर्गत जलसिंचनाचे काम होणार आहे. यासाठी जि.प.च्या लघुसिंचन विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. मात्र जलशक्ती अभियानावर खर्च करण्यात येणारा निधी हा जि.प.चा असल्याने काही सदस्यांनी त्याला विरोध केला होता. काम थांबविण्याबाबत ठरावदेखील करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जलशक्तीचा निधी खर्च करण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे जलशक्तीचे काम हे लघु सिंचन विभागाशीच निगडीत असल्याने जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत जलशक्तीचा निधी खर्च करण्याबाबत ठराव करण्यात आला.खर्चाबाबत आक्षेपस्थायी समिती सदस्य नाना महाजन यांनी जलशक्ती या केंद्र सरकारच्या योजनेवर खर्च करण्यात येणारा निधी हा जिल्हा परिषदेचा असल्याने सुरुवातीपासूनच जलशक्तीच्या कामाला विरोध केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी काम थांबविण्याबाबत ठरावदेखील केला. दरम्यान आता जलव्यवस्थापनच्या बैठकीत काम सुरु करण्याबाबत ठराव करण्यात आल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतले आहे.लघु सिंचनचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांना या कामात अधिक रस असल्याने त्यांनी सदस्यांची दिशाभूल करून काम सुरु करण्याबाबत ठराव केला असेल असा आरोप केला आहे. नाईक यांच्याकडे दिशाभूल करण्याचा हातखंडा असल्याने जलव्यवस्थापनच्या बैठकीत त्यांनी सदस्यांची दिशाभूल करून ठराव केला असेल. मात्र ते काम बेकायदेशीर असल्याचाही आरोप नाना महाजन यांनी केला आहे.चौपदरीकरणात जि.प.च्या मालकीच्या पाझर तलावातील मुरुमाचा वापरभुसावळ तालुक्यातील साकरी येथील पाझर तलावातून उत्खनन केलेल्या मुरुमाचा वापर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणासाठी करण्यात आला आहे. पाझर तलाव जि.प.च्या मालकीचे असल्याने २५ टक्के महसूल जि.प.च्या सेसफंडात जमा करावयाचे आहे. परंतु गेल्या दहा महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचा महसूल जमा करण्यात आलेला नाही. रक्कम जमा करण्याबाबत मे.आयुष प्रोकॉन प्रा.लि.कंपनीला नोटीस पाठविण्यात आली होती. आठवडाभरात रक्कम भरण्याचे आदेश देण्यात होते. मात्र मुदत संपल्यानंतरही महसूलाची रक्कम भरली नसल्याने जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी जलव्यवस्थापनच्या बैठकीत तक्रार केली.नाहरकत दाखला देण्यास मंजुरीखासदार उन्मेष पाटील यांनी जलसंधारण महामंडळ योजनेंतर्गत १६ सिमेंट बंधारे बांधण्यासाठी निधी मंजूर केला आहे. १६ कोटींचा निधी मंजूर असून काम सुरु करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत नाहरकत दाखला देण्यास मंजुरी देण्यात आलीे. पारोळा, चाळीसगाव, पाचोरा तालुक्यात नदीवर सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव