धरणगाव : येथे इंदिरा गांधी विद्यालयात खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेच्या बैठकीसाठी ओबीसी आरक्षण परिषदेची नियोजन बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नीलेश चौधरी होते. व्यासपीठावर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन उपस्थित होते. याप्रसंगी ओबीसीमध्ये असलेले सर्व समाजप्रमुख हजर होते. भीमराव पाटील, विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, वासुदेव बडगुजर, अनिल बडगुजर, चंद्रकांत भावसार, विनोद रोकडे, दीपक बागुल, सुनील चौधरी, रतीलाल चौधरी, नगरसेवक वासू चौधरी, भागवत चौधरी, विलास महाजन, कडू रूपा महाजन, किरण सोनवणी, नगर मोमीन, आबासाहेब महाजन, बाळासाहेब जाधव, अशोक झुंझारराव, गोरख देशमुख, लक्षण पाटील, बोरसे, राजेंद्र पडोळ, एस.डब्ल्यू. पाटील, आकाश बिवाल, बापू सोनार इ. मान्यवर उपस्थित होते.
230921\img_20210922_185222.jpg
फोटो कॅप्शन: ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक प्रसंगी उपस्थित काँग्रेसचे प्रदेश सचिव डी जी पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी.