शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रावेर- यावल तालुक्यातील ३१ गावातील पोलीस पाटलांचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:59 IST

जळगाव जिल्ह्यातील रावेर- यावल तालुक्यातील ११ नवीन तर २० जुन्या गावातील पोलीस पाटील पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहिला राखीव असलेल्या जागा झाल्या खुल्यानवीन आरक्षणात ३० टक्के महिलांसाठी राखीव जागा

फैजपूर जि. जळगाव : येथील उपविभागीय कार्यालय अंतर्गत यावल -रावेर तालुक्यातील पोलीस पाटील भरतीचे आरक्षण जाहिर झाले आहे. यात एकूण ३१ गावांचे आरक्षण प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी जाहीर केले.दोन्ही तालुक्यातील ३६ जागांवर ही पोलीस पाटील परीक्षा घेण्यात आली होती. त्यात १६ उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले होते. यात काही उमेदवारांनी आॅनलाइन फॉर्म भरलेच नसल्यानें तसेच काही जागांवर उमेदवार नापास ठरल्याने या २० रिक्त जागांवर तसेच नव्याने रावेर- यावल तालुक्यातील ११ जागांचे आरक्षण २३ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आले असल्याची माहिती फैजपूर येथील प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.यात प्रामुख्याने ज्या गावात पोलीस पाटील यांची पदे महिलांसाठी राखीव होते त्या ठिकाणी खुले करण्यात आले आहे. यात महिलांसाठी ३० टक्के राखीव पोलीस पाटील आरक्षण काढण्यात आले आहे. तसेच फैजपुर उपविभागातील संबंधीत गावांतील पदासाठी या गावातील पोलीस पाटील भरतीसाठी आरक्षण काढण्यात आले आहेत.रावेर तालुक्यातील रिक्त पदेबोहर्डी-अनुसूचित जाती, नांदूरखेडा- महिला- अनुसूचित जमाती , खानापूर - खुला, विमुक्त जाती , वाघोड-खुला, भटक्या जमाती अ, दोधे-खुला भटक्या जमाती, खिरवड-भटक्या जमाती ब, तामसवाडी- खुला जनरल, नीमडया-अनुसूचित जाती पेसा राखीव, मोहगण-खुला अनुसूचित जमाती , मोहमांडली-अनुसूचित जाती पेसा राखीव, कुसुंबा खु-अनुसूचित पेसा राखीव, लालमाती-खुला अनुसूचित जमाती पेसा, चिनावल-जनरल, मस्कावद सिम-इतर मागासवर्ग , कोचूर खुर्द-जनरल महिला, मंगरूळ-अनुसूचित जाती पेसा राखीव, थेरोळा-महिला इतर मागावर्गीय ,रसलपूर-भटक्या जमाती .यावल तालुकाभोरटेक-अनुसूचित जाती जमाती, कोरपावली-अनुसूचित जाती जमाती, निमगाव-महिला अनुसूचित जमाती, भालोद-विमुक्त जाती अ, राजोरा- भटकी जमात ब, बोरखेडा खुर्द-अनुसूचित जमाती, पिंपरूड-महिला इतर मागासवर्गीय, कठोरे प्र.सावदा-अनुसूचित जमाती , किनगाव बुद्रुक-महिला भटकी जमात क , वड्री-महिला अनुसूचित जाती, डोंगर कठोरा-अनुसूचित जाती ,इचखेडा-महिला अनुसूचित जमाती, डांभुर्णी-जनरल 

टॅग्स :Policeपोलिस