गाळ्यांसह वॉटरग्रेस लवादक ठरावाबाबतची मागविली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:17 AM2021-05-19T04:17:02+5:302021-05-19T04:17:02+5:30

अनेक प्रभागांमध्ये रस्ते दुरुस्तीला मुहूर्ताची प्रतीक्षा जळगाव : शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळाली असून, काही ...

Requested information on Watergrass Arbitration Resolution with Cheeks | गाळ्यांसह वॉटरग्रेस लवादक ठरावाबाबतची मागविली माहिती

गाळ्यांसह वॉटरग्रेस लवादक ठरावाबाबतची मागविली माहिती

Next

अनेक प्रभागांमध्ये रस्ते दुरुस्तीला मुहूर्ताची प्रतीक्षा

जळगाव : शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळाली असून, काही प्रभागांमध्ये कामाला सुरुवात देखील झाली आहे. मात्र, अद्यापही ६-७ प्रभागांमधील कामांना सुरुवात झालेली नाही, शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

आव्हाणे, खेडी परिसराला पावसाने झोडपले

जळगाव- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. त्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जळगाव तालुक्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी या परिसराला पंधरा मिनिटे जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. वादळासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागाला काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वृक्ष कोलमडल्याने दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडित झाला होता.

Web Title: Requested information on Watergrass Arbitration Resolution with Cheeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.