शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

प्रगती विद्यामंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात ...

प्रगती विद्यामंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायन करून मानवंदना देण्यात आली व उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी चेअरमन प्रेमचंद ओसवाल, सचिव सचिन दुनाखे, मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

००००००००००००००००

पोदार इंटरनॅशनल स्कूल (फोटो)

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुख्याध्यापक गोकुळ महाजन यांनी भारताच्या संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन करून ध्वजारोहण केले. याप्रसंगी राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांची व्याप्ती व सर्वसमावेशकता समजावून घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूलतत्त्वे समाज मनावर कोरली जावीत याचा परिपूर्ण परिचय उपस्थितांना करून दिला. त्यानंतर महिला शिक्षिकांतर्फे गीतगायन आणि नृत्याचे सादरीकरण झाले. संस्कृती पाटील हिने भाषण केले, तर नायशा त्रिवेदी आणि सुबोध साठे या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर उत्कृष्ट गीत सादर केले. याप्रसंगी उपप्राचार्य रूपेश घाटगे, मुख्याध्यापिका उमा वाघ, व्यवस्थापक जितेंद्र कापडे, मीनाक्षी राणे आदींची उपस्थिती होती.

०००००००००००००००००००

विवेकानंद इंग्लिश मिडीयम (फोटो)

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत इयत्ता नववी-दहावीचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिरंग्याला सलामी देत मानवंदना दिली. या ध्वजारोहण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सतरा वर्षे आर्मीमध्ये यशस्वी सेवा देणारे महेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, हेमराज उमेश इंगळे आदींची उपस्थिती होती. महेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी डहाळे यांनी केले़ जयमाला चौधरी यांनी आभार मानले.

००००००००००००००००००००००

शानभाग विद्यालय (फोटो)

ब.गो. शानभाग विद्यालयात मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे, शशिकांत पाटील, पद्माकर इंगळे आदींच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांनी सूरज बारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे जोशपूर्ण सामूहिक देशभक्तीपर स्फूर्तीगीत ‘भारत का रहेनेवाला हु भारत की बात सुनाता हु’ हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील आणि रवींद्र पाटील यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमाता प्रतिमापूजन व ध्वजपूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख केतन कोल्हे यांच्यासह विद्यालयातील क्रीडाशिक्षक व शालेय परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. शेवटी खाऊवाटप करण्यात आला.

०००००००००००००००००००००

ओरियन, प.वि. पाटील, ए.टी. झांबरे विद्यालय

ओरियन स्टेट बोर्ड स्कूल, ए.टी. झांबरे, जी.पी.व्ही.पी. व ओरियन सी.बी.एस.ई.स्कूल यांचा एकत्रित ध्वजरोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी संदीप साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आो. या वेळी ए.टी. झांबरेचे मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी, जी.पी.व्ही.पी.शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, ओरियन सीबीएससीच्या प्राचार्या सुषमा कंची आदी उपस्थित होते.

०००००००००००००००००००००००

एल.एच. पाटील इंग्लिश मिडियम स्कूल

एल.एच. पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एल.एच. पाटील, कुणाल राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पाहुण्यांचे स्वागत स्कूलच्या प्राचार्या शिल्पा मलारा यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पध्दतीने विविध देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आले. गीतगायन स्पर्धा, तिरंगा तयार करणे आदी स्पर्धांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नजा शाह यांनी केले.

००००००००००००००००००००००००

इकरा शिक्षण संस्था

इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा एज्युकेशन कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले़ यावेळी इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तसेच इकरा बीएड कॉलेज, इकरा डीएड कॉलेज आदींचे प्राचार्य उपस्थित होते.

०००००००००००००००

आर.आर. विद्यालय

ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर. विद्यालय, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, भाऊसाहेब लाठी विद्यामंदिर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले़ कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले़ याप्रसंगी बी़ ए़ पानपाटील, आर.एस. सोनवणे, दिलीप लाठी, मुकुंद लाठी, विजय लाठी, वसंतराव सोनवणे, एम.के. कासट, विजय रोकडे, डी.टी. पाटील, आर.बी. महाजन, पी.आर. श्रावगी, योगेश चौधरी, गजमल नाईक आदी शिक्षक उपस्थित होते.

०००००००००००००००००

बाहेती विद्यालय

अ‍ॅड. एस.ए. बाहेती कला, वाणिज्य, विज्ञान विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला़ संस्थेच्या उपाध्यक्षा उज्ज्वला बाहेती यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी रोहन बाहेती, सुरेश पाटील, नितीन बरडे, प्राचार्य अनिल लोहार, डी़ वाय़. हिवरे, आर.पी. सोनवणे, बी.जे. लाठी, गौतम भालेराव, सतीष कोगटा, रोहित कोगटा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात एनसीसी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

००००००००००००००००००००

कमलादेवी मणियार विद्यालय

मेहरूण येथील कमलादेवी मणियार विद्यालयात सुधाकर महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सोमनाथ सानप, एस.एम. खंबायत, सविता चौधरी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कविता वंजारी यांनी केले़ कार्यक्रमात कैलास थोरवे, मनोज पाटील, मनीषा खैरणार आदींची उपस्थिती होती.