शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वैजनाथ येथील वाळू उपशाच्या अहवालात ‘गोलमाल’चा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 13:27 IST

ठेका रद्दची नोटीस

ठळक मुद्दे अहवालात दाखविले किरकोळ अटींचे उल्लंघननवीन अहवालात जुनेच मुद्देशासनाचा महसूल बुडविला

जळगाव : अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचा संशय आल्याने मोजणी करण्यात आली. वैजनाथ वाळू ठेक्याचा अहवाल मात्र मोजणी करणाºया अधिकाºयांनी ‘गोलमाल’ केला असून केवळ किरकोळ अटींचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे दर्शविले आहे.या अहवालावरून संबंधीत ठेकेदाराला वाळू ठेका रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र तो देखील निव्वळ फार्स ठरण्याची शक्यता आहे.गिरणा नदीपात्रातील एरंडोल तालुक्याच्या हद्दीतील वैजनाथचा वाळू गट क्र.१११ ते ११३ चा ठेका धनराज घुले रा. पांढरे प्लॉट, पिंप्राळा यांना दिला असून संबंधीत ठेकेदारही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करीत असून रात्रंदिवस वाळू वाहतूक करणारी वाहने रामानंदनगर रस्त्यावरून भरधाव ये-जा करीत असतात. दरम्यान २१ मार्च रोजी शनिवारी अपर जिल्हाधिकाºयांनी पुन्हा अचानक भेट दिली असता नदीपात्रात ठेक्याच्या क्षेत्राबाहेर खड्डे आढळून आले. त्यामुळे या ठेक्याची मोजणी उपअधिक्षक भूमिअभिलेख, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांताधिकारी व तहसीलदार एरंडोल यांनी केली होती. तर वरिष्ठ भू-वैज्ञानिक प्रतिनिधी मात्र गैरहजर होते. हा मोजणी अहवाल सोमवार, २ एप्रिल रोजी जिल्हाधिकाºयांना सादर झाला. त्यात हा मक्ता २०७८ ब्रासचा असताना या ठिकाणी एकूण ८६३.१४ ब्रास वाळू खोदकाम झाले असल्याचेच अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्वत: अपर जिल्हाधिकाºयांनी पाहणी केल्यानंतर मोजणी होऊनही अहवाल गोलमाल झाला असल्याची चर्चा आहे.उपसा झाला तेवढ्या वाळू साठ्याच्या पावत्याही फाडल्या गेल्या आहेत का? याची तपासणी होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.नवीन अहवालात जुनेच मुद्देसावखेडा ग्रा.पं.ने केलेल्या तक्रारीवरून या ठेक्याची मोजणी जानेवारी महिन्यात केली होती. तो अहवालही अधिकाºयांनी हातमिळवणी करून गोलमाल केला असल्याचीचर्चाआहे. त्या अहवालातील मुद्देच २७ मार्च २०१८ रोजीच्या मोजणीबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. एखादा मक्तेदार जर त्याच-त्याच अटींचे उल्लंघन वारंवार करीत असतानाही अधिकारी मात्र केवळ नाममात्र दंड आकारून डोळेझाक करतात, याचा अर्थ काय? असा सवाल उपस्थित होत आहे.शासनाचा महसूल बुडविलासावखेडा ग्रा.पं.कडूनच अनेकदा तक्रारी झाल्याने यापूर्वी दोन वेळा या ठेक्याची मोजणी झाली आहे. त्यात मागील मोजणीच्यावेळी ठेक्याच्या क्षेत्राबाहेर नदीपात्रात वाळू उपसा केल्याचे व रात्रीतून जेसीबीने खड्डे सपाट करून टाकल्याचे आढळून आले. मात्र अधिकाºयांची ठेकेदाराशी हातमिळवणी असल्याने त्यावेळीही अहवाल गोलमाल करून अवैध उपसा न दाखविता इतर अटींशर्र्तींचा भंग झाल्याने २ लाख ८२ हजारांचा दंड करण्यात आला. नवीन वाळू धोरणानुसार अवैध वाहतूक करणाºया एका वाळूच्या ट्रकला जेवढा दंड होईल,तितका दंड या मक्तेदाराला करून शासनाचा महसूल बुडविण्याचे काम झाले.काय म्हटले आहे अहवालात...सीमांकनाबाहेर उपसा करण्यात आला आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने ठरवून दिलेल्या ०.५ मीटर खोलीपेक्षा जास्त म्हणजे २ ते ३ मीटर खोदकाम करून वाळू उपसा केला आहे.मोजणी वेळी ठेक्याच्या आखून दिलेल्या सीमा आढळून आल्या नाहीत.वाळू वाहतूक करताना ताडपत्री झाकली जात नाही.४हरीत पट्टा विकसित केला नाही.----------वैजनाथ वाळू ठेका रद्द करण्याची मागणीएरंडोल तालुक्यातील वैजनाथ नदीपात्रातील वाळू उपसा शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा ज्यादा प्रमाणात केल्याने वाळू ठेका रद्द करण्याची मागणी बहुजन रतय परिषदेतर्फे प्रदेश उपाध्यक्ष ए.एम. बाविस्कर यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या ठेकेदाराला पाठीशी घालणाºया अधिकाºयांवर कारवाईची मागणीही केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.