शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दोन मिनिटावरच्या वॉर्डमध्ये रिपोर्ट पोहोचतो १२ तासांनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:25 IST

शासकीय कामाचा नमुना : प्रयोगशाळा झाली तरीही अडचण कायम

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर जळगावसाठी कोरोना चाचणी प्रयोगशाळा जळगावात सुरू झाली खरी; परंतु शासकीय कामकाजाचा प्रत्यय याठिकाणीही पहायला मिळत आहे. कोरोना संशयिताचा रिपोर्ट यायला जेवढा वेळ लागत नाही, त्यापेक्षा जास्त वेळ तो रिपोर्ट कोरोना संशयितांच्या वॉर्डमध्ये पोहोचण्यास लागत आहे. दोन मिनिटावर असलेल्या या वॉर्डमध्ये हा रिपोर्ट पोहोचण्यास १२ ते १८ तास लागत आहेत.कोरोनाचे निदान होईपर्यंत सर्व रुग्ण हे संशयितांच्या वॉर्डमध्ये ठेवले जातात. त्यामुळे एखाद्याचा रिपोर्ट जेवढा लवकर येईल, तेवढे कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्यादृष्टीने चांगले राहते. कोरोनाचा वाढता प्रसार आणि वाढलेला मृत्यूदर यामुळे जळगावमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली. यापूर्वी एखाद्या संशयितांचा रिपोर्ट येण्यास तीन ते चार दिवस लागत होते. मात्र जळगावात प्रयोगशाळा झाल्यानंतर हे रिपोर्ट दुसऱ्याचदिवशी येत आहेत. मात्र, रिपोर्ट आल्यानंतर शासकीय कामाच्यागतीने हा अहवाल कोरोना संशयितांच्या वॉर्ड पर्यंत पोहोचण्यास बराच वेळ जात आहे. कारण तब्बल तीन प्रक्रियेतून हा रिपोर्ट जातो.रिपोर्ट प्रिंट केल्यानंतर तो पहिल्यांदा कार्यालयात जातो, त्यानंतर तो मेडिकल विभागात जातो आणि शेवटी तो वॉर्डमध्ये जातो. जोपर्यंत हा रिपोर्ट लेखी स्वरुपात येत नाही, तोपर्यंत रुग्णही त्यांना अन्य वॉर्डमध्ये हलवू देत नाहीत. हा लेखी अहवाल वॉर्डमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल १२ ते १८ तास लागतात. विशेष म्हणजे रिपोर्ट ज्याठिकाणी प्रिंट केला जातो, ते कार्यालय अन् वॉर्डमध्ये दोन मिनिटाचंही अंतर नाही.कोरोना संशयितांचा रिपोर्ट आल्यानंतर पॉझिटीव्ह रुग्णांना दुसºया वॉर्डमध्ये हलवले जाते तर निगेटीव्ह रुग्णांना घरी सोडले जाते वा अन्य रुग्णालयात पाठवले जाते.निगेटीव्हसाठी वॉर्डच नाहीसध्या कोविड रुग्णालयात कोरोनाचा संशयित रुग्ण निगेटीव्ह आढळला; परंतु त्याला उपचाराची गरज असेल तर त्याला अन्य रुग्णालयात नेण्यावाचून पर्याय राहत नाही. कारण निगेटीव्हसाठी कोविड रुग्णालयात वॉर्डच नाही. अन्य रुग्णालयात रुग्ण नेण्याच्या कामासाठी दोन डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव