शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना गुंडाळत शासनाने मागविला अहवाल; प्रभाव ‘लोकमत’चा

By विलास बारी | Updated: November 3, 2023 17:49 IST

सचिवांनी मागविला साहाय्यक कामगार आयुक्तांकडून अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाकडून नोंदीत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह व रात्रकालीन भोजन योजनेतील अनागोंदी ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर शासनाने आता ही योजना गुंडाळली आहे. तसेच या योजनेशी संबंधित अहवाल उपसचिव दा.सो. खताळ यांनी मागविला आहे. दरम्यान, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी जळगावच्या साहाय्यक कामगार आयुक्तांकडून याबाबत अहवाल मागविला आहे.

राज्यातील बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रकालीन भोजनासाठी राज्य शासनाने ३० ऑगस्ट २०२१ पासून मुंबईसह राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये योजना सुरू केली. जळगाव, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अहमदनगर या ठिकाणी भोजन पुरविण्यासाठी मे. इंडो अलाईड प्रोटीन फूडस् प्रा.लि. या कंपनीसोबत शासनाने करार केला आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान झालेले दुर्लक्ष, करारनाम्यातील अटी व शर्तींच्या उल्लंघनाकडे केलेला कानाडोळा, बांधकाम मजुरांऐवजी दुसऱ्याच याद्यांना देण्यात आलेली मंजुरी या सर्व बाबी ‘लोकमत’ने दि. ८ ते १३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान प्रसिद्ध केल्या होत्या. या वृत्तमालिकेची दखल घेत शासनाने राज्यातील सर्वच कामगार आयुक्त कार्यालयांकडून माहिती मागविली.

वित्तीय कारण देत केली योजना बंदया योजनेच्या अंमलबजावणीवेळी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेतील तरतुदीस पाच वर्षे झाली तसेच वित्तीय आणि प्रशासकीय बाबी लक्षात घेता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सर्व कामगार आयुक्त कार्यालयांना कळविण्यात आले आहे.

योजना बंद केली; मात्र, अदा केलेल्या रकमेचे काय?शासनाने वित्तीय कारण देत ही योजना गुंडाळली आहे. मात्र, साहाय्यक कामगार अधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच या योजनेतील भोजन बिलाची रक्कम ठेकेदाराच्या खिशात गेली. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सचिवांनी मागविला साहाय्यक कामगार आयुक्तांकडून अहवाल‘लोकमत’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून या योजनेतील अनागोंदी समोर आणल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी साहाय्यक कामगार आयुक्तांकडून अहवाल मागविला आहे. मात्र, ज्यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप आहे, त्यांच्याकडून अहवाल मागविणे योग्य नसल्याने यावर आपण आक्षेप घेतला असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण सपकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पालकमंत्र्यांनी मागविली माहिती

या योजनेतील अनागोंदीची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत बिरार यांना कागदपत्रांसह हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत. या आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे.