शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यात उत्तराच्या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:11 IST

शुक्रवारी रात्रभर भिज पावसामुळे खरीपासह बागायती पीकांना फायदा

ठळक मुद्देशुक्रवारी रात्री झालेल्या सरासरी ३८.६ मिलीमीटर पावसामुळे आजपर्यंत एकूण सरासरी ४७५. ६ मिलीमीटर पाऊस झाल्याने ७१. २० टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील हतनूर, सुकी,मंगरूळ व आभोडा मध्यमसिंचन प्रकल्पाची धरणे १०० टक्के भरली असली तरी, लघुसिंचन प्रकल्पातील गंगापुरी धरण १०० टक्के भरले आहे.मात्राण व चिंचाटी ही धरणं मात्र ६० टक्केच भरली आहेत.

रावेर, जि.जळगाव : तालुक्यात शुक्रवारी रात्री उत्तराच्या पावसाने सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास १५ ते २० मिनिटे दमदार हजेरी लावल्यानंतर रात्री साडेआठ वाजेपासून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मध्यमस्वरूपाच्या भिज पावसाने संततधार हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग कमालीचा सुखावला आहे. खरीप हंगाम आताच्या औटघटकेला फलधारणेच्या अवस्थेत असताना वरूणराजाने लावलेली दमदार हजेरी शेतकरीवगार्ला तारणहार ठरली आहे. यातूनच बागायती पीकांसह भूजलसिंचनासाठीही ‘उत्तरा’चा पाऊस लाभदायी ठरणार असल्याने एकच आनंद व्यक्त होत आहे.तालुक्यात गत तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने ऐन फुल व फलधारणेच्या अवस्थेतील खरीपाची ज्वारी, मका, जिरायत व बागायती कापूस, सोयाबीन, भुईमूग वा तूर आदी पिकांना काहींशी ताण बसली होती. परिणामी खरीपाच्या उत्पादनाला त्याची काहींशी झळ बसून उत्पादनावर विपरीत परिणाम जाणवणार असल्याचे चित्र आहे. तथापि, शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उत्तरा पर्जन्यनक्षत्रातील दमदार पावसाने पुनर्रागमन करीत १५ ते २० मिनीटे तालुक्यात हजेरी लावली. दरम्यान, रात्री साडेआठ वाजेपासून उत्तराच्या पावसाने मध्यम स्वरूपाच्या भिज पावसाने मुक्काम ठोकत आज सकाळी आठ वाजेपर्यंत संततधार कायम ठेवल्याने शेतकरीवर्ग कमालीचा सुखावला आहे. फलधारणेच्या अवस्थेतील ज्वारी, मका, तूर, कपाशी, सोयाबीन व भुईमूग खरीप पीकांसाठी ही अमृत संजीवनी ठरली असून बागायती पिकांसह भूजलसिंचनासाठीही हा उत्तराचा पाऊस अत्यंत उपयुक्त असल्याचे ज्येष्ठांचा सूर आहे. 

टॅग्स :RainपाऊसRaverरावेर