शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील 200 व्यापा:यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:05 IST

खुलाशाने समाधान : जीएसटी लागू नसलेल्या मालाला नोंदणीची आवश्यकता नाही

ठळक मुद्दे व्यापा:यांना दिलासादाळमिलला मात्र नोंदणी आवश्यक‘ग्रोमा’ संघटनेने दिले सरकारला पत्र

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 -  ज्या मालावर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू नाही अशा अन्नधान्य व इतर मालाच्या व्यापा:यांना जीएसटी नोंदणी करणे गरजेचे नसल्याचा स्पष्ट खुलासा करण्यात आल्याने जळगावातील 200 व्यापा:यांना दिलासा मिळाला आहे. 1 जुलै रोजी जीएसटी लागू होणार असल्याने त्यापूर्वीपासूनच व्यापा:यांची धावपळ सुरू होती. यात अनेक अडचणी आल्यातरी व्यापा:यांनी यात नोंदणी केली.  असे असले तरी अन्नधान्य व  ज्या मालांना जीएसटी लागू नाही, अशा व्यापा:यांनी काय करावे या बाबत व्यापा:यांमध्ये संभ्रम होता.  

‘ग्रोमा’ संघटनेने दिले सरकारला पत्ररजिस्टर ट्रेडमार्क ब्रॅण्डेड तांदूळ, डाळी यांच्यावर जीएसटी लागू आहे, मात्र जे अन्नधान्य रजिस्टर ट्रेडमार्क नाही त्यांना जीएसटी लागू नाही व त्याचा जे व्यापार करतात त्यांनी मालाची विक्री, आयात, निर्यात कशी करावी या बाबत ‘द ग्रेन, राईस अॅण्ड ऑईलसीडस् र्मचट असोसिएशन’ (ग्रोमा) या संघटनेने संबंधित खात्यास 18 ऑगस्ट रोजी पत्र देऊन जीएसटीतील सेक्शन 23 आणि 24 या बाबत  स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार जीएसटी आयुक्तालयाने (मुंबई) 31 ऑगस्ट रोजी संघटनेला पत्र देऊन या बाबत स्पष्टीकरण केले. यात म्हटले आहे की, ज्या मालावर जीएसटी लागू नाही, त्या मालाच्या व्यापा:यांना नोंदणीची आवश्यकता नाही. यात व्यापारी  विनानोंदणी आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात, निर्यातही करू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  या सोबतच अशा व्यापा:यांनी नोंदणी केली असल्यास ते ती रद्द करू शकतात. 

या स्पष्टीकरणामुळे जळगावातील धान्य व इतर अशा 200 व्यापा:यांना दिलासा मिळाला आहे. तसे पाहता यापूर्वीच हा दिलासा होता, मात्र स्पष्ट निर्देश नसल्याने संभ्रम होता. मात्र या पत्रामुळे तो आता दूर झाला आहे. आता हे व्यापारी विनानोंदणी महाष्ट्रासह इतर राज्यात, राष्ट्रात माल पाठवू शकतात अथवा आणू शकतात. 

दाळमिलला मात्र नोंदणी आवश्यकब्रॅण्डेड डाळींवर पाच टक्के जीएसटी लागू असल्याने आता त्या डाळी विनाब्रॅण्ड विक्री होत आहे. त्यामुळे त्यांना जीएसटी लागत नाही, असे असले तरी दालमिलला नोंदणी आवश्यक राहणार आहे. कारण डाळींच्या  पॉलिशसाठी तेल,    पॅकिंगसाठी बारदान खरेदी या सर्व कारणांमुळे डालमिलला नोंदणी गरजेची असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ज्या मालाला जीएसटी लागत नाही, अशा मालाच्या व्यापा:यांच्या जीएसटी नोंदणीबाबत ‘ग्रोमा’ संघटनेने विचारणा केली होती. त्यानुसार संबंधित खात्याकडून स्पष्टीकरण मिळाल्याने जळगावातील 200 व्यापा:यांचा संभ्रम दूर होऊन दिलासा मिळाला आहे. - प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा अॅण्ड र्मचट असोसिएशन.