शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथील डॉ.सी.जी.चौधरी यांच्या दवाखान्यात भराडीच्या तरुणीच्या मृत्यूमुळे नातेवाईकांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 19:19 IST

पोटदुखीच्या त्रासामुळे डॉ.सी.जी.चौधरी यांच्या दवाखान्यात दाखल केलेल्या दीपाली नाना पाटील (वय १८ रा.भराडी, ता.जामनेर ह.मु.सुरत) या तरुणीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. रुग्णाचे हाल होत असताना डॉक्टर दोन तास पुजेत गुंतले व त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी दवाखान्यात गोंधळ घातला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरही चार तास गोंधळ सुरुच होता.

ठळक मुद्देडॉक्टर अडीच तास पुजेत गुंतल्यामुळे उपचार झाले नसल्याचा आरोपश्वासनलिकेत सफरचंदाचा तुकडा अडकल्याने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाजशवविच्छेदन करण्यास नातेवाईकांचा नकार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१९ : पोटदुखीच्या त्रासामुळे डॉ.सी.जी.चौधरी यांच्या दवाखान्यात दाखल केलेल्या दीपाली नाना पाटील (वय १८ रा.भराडी, ता.जामनेर ह.मु.सुरत) या तरुणीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. रुग्णाचे हाल होत असताना डॉक्टर दोन तास पुजेत गुंतले व त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी दवाखान्यात गोंधळ घातला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरही चार तास गोंधळ सुरुच होता.

याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील भराडी येथील दीपाली नाना पाटील या तरुणीला गुरुवारी मध्यरात्री पोटदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागल्याने तिला पहाटे पाच वाजता दक्षता नगर पोलीस लाईनसमोरील डॉ.सी.जी.चौधरी यांच्या नित्यसेवा नर्सिंग होम या दवाखान्यात दाखल करण्यात आले. आठ वाजेपर्यंत डॉक्टरांनी तिच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. नंतर रक्त, लघवी तपासणी करुन सोनोग्राफीसाठी रुग्णाला बाहेर पाठविण्यात आले. त्यानंतर डॉक्टर पूजेसाठी गेले, त्याच वेळी रुग्णाला जास्त वेदना होऊ लागल्या. वारंवार डॉक्टरांना बोलावले असता ते पूजेत असल्याचे सांगण्यात येत होते. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने दुपारी दोन वाजता तरुणीचा मृत्यू झाला.

अन् डॉक्टरांवर संताप वाढलासोनाग्राफी व रक्ताच्या चाचण्यांसाठी तरुणी स्वत: चालत बाहेर गेलेली असताना अचानक प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त करुन डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला.प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून डॉ.सी.जी.चौधरी यांनी जिल्हा पेठ पोलिसांना तसेच अन्य डॉक्टरांना दवाखान्यात बोलावून घेतले. तर नातेवाईकांनीही जि.प.चे माजी सदस्य समाधान पाटील व अन्य नातेवाईकांनी बोलावून घेतले. नातेवाईक व डॉक्टर यांच्यात जोरदार वाद झाला. वाद वाढत असल्याने पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनीही घटनास्थळ गाठले. डॉक्टर व नातेवाईक यांचे म्हणणे समजूत घेत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

शवविच्छेदन करण्यावरुनही वादमयत तरुणीचे आई, वडील सुरत येथे राहत असल्याने डॉक्टरांवरील आरोप मागे घेत शवविच्छेदन करण्यास नकार दिला. मात्र पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असल्याने मृत्यूचे कारण कळण्यासाठी शवविच्छेदन करणे गरजेच आहे.डॉ.चौधरी यांनी मृत्यूचे कारण लिहून दिले तरच विना शवविच्छेदन करता मृतदेह नेता येईल, असे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी स्पष्ट केले, मात्र डॉ.चौधरी यांनी मृत्यूचे कारण देण्यास नकार दिला. त्यामुळे शवविच्छेदन करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे गायकवाड यांनी समजावून सांगितले.