शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील वाघोड दूध उत्पादक सहकारी संस्थेचा दूध खरेदीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 16:44 IST

जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडून प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व जिल्हा दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादकांचे देय पेमेंट अनियमित येत असल्याच्या सबबीखाली सकाळ व सायंकाळी ५० लीटर दुधाचा पुरवठा करणाऱ्या केवळ एकाच दूध उत्पादक शेतकºयाचे दूध खरेदी करण्यास तालुक्यातील वाघोड दूध उत्पादक सहकारी सोसायटीने ठेंगा दाखवला आहे.

ठळक मुद्देराजकीय द्वेषातून अवसानघातकी निर्णयामुळे दूध उत्पादकावर संकटजिल्हा दूध उत्पादक संघावर फोडले खापर

रावेर, जि.जळगाव : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडून प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व जिल्हा दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादकांचे देय पेमेंट अनियमित येत असल्याच्या सबबीखाली सकाळ व सायंकाळी ५० लीटर दुधाचा पुरवठा करणाऱ्या केवळ एकाच दूध उत्पादक शेतकºयाचे दूध खरेदी करण्यास तालुक्यातील वाघोड दूध उत्पादक सहकारी सोसायटीने ठेंगा दाखवला आहे. सदर संस्थाचालक व प्रशासनाने राजकीय आकसापोटी अवसानघातकी निर्णय घेऊन अन्याय केल्याची तक्रार दूध उत्पादक जगदीश महाजन यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे केली आहे.वाघोड येथील दूध उत्पादक शेतकरी जगदीश सुधाकर महाजन यांच्या तक्रारीतील आशय असा की, शेतीला जोडधंदा म्हणून १५ म्हशींचे त्यांनी पशुपालन केले आहे. बºहाणपूर येथील खासगी व्यापाºयाकडे ते सकाळी व सायंकाळी असे एकूण ५० लीटर दूध पुरवठा करीत होते. दरम्यान, सदर व्यापाºयाने दूध खरेदीस नकार दिल्याने गेल्या १५ दिवसांपासून ते गावातील सहकारी दूध उत्पादक सोसायटीत दूध पुरवठा करीत होते. सदर संस्थेचे चेअरमन व सचिव यांनी संचालक मंडळाच्या स्वाक्षरी असलेल्या पत्राद्वारे आज अचानक सायंकाळी आपले दूध खरेदी करू शकणार नसल्याची लेखी सूचना देण्याचा निर्णय घेऊन अन्याय केल्याचा आरोप केला आहे.या संस्थेकडे दुधाच्या पेमेंटची कोणतीही मागणी केली नसताना मात्र थेट जिल्हा दूध उत्पादक संघावर खापर फोडत संघाने प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे व जिल्हा संघाकडून दूध उत्पादकांना देय पेमेंट अनियमित मिळत असल्याने व संस्थेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची अवास्तव कारणे दाखवून दूध खरेदी करू शकत नसल्याची दिलेली लेखी सूचना अन्याय करणारी व अवसानघातकी असल्याचा आरोप केला आहे. जिल्हा दूध संघाच्या पेमेंटमध्ये अनियमितता असेल व प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात केली जात असेल व सोसायटीची परिस्थिती नाजूक असेल तर त्याचा परिणाम म्हणून केवळ एकट्या दूध उत्पादकाचेच ५० लीटर दूध नाकारण्याची मनमानी कशासाठी, असा सवालही त्यांनी केला आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाRaverरावेर