शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रावेर येथे शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर हस्तलिखित पेऱ्यावर नोंदणी करण्यास ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 16:59 IST

शेतकरी बांधवांच्या घरात मळणी करून ज्वारीचे उत्पादन घरात येऊनही संगणकीय सातबारा उताºयावर मात्र आॅनलाइन ज्वारी पिकाच्या पेºयाची नोंदणी झाली नसल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांची ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या यंत्रणेने ठेंगा दाखवला असल्याने शेतकरीवर्ग वाºयावर सुटला आहे.

ठळक मुद्देमळणी करून ज्वारी घरात येऊनही संगणकीय सातबारा उताºयावर आॅनलाइन पेरा नाहीशेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या यंत्रणेकडून शेतकºयांना नाव नोंदणीच्या रांगेतून बाहेर काढून हाकलून लावण्यात येत असल्याने कमालीचा संतापप्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे शेतकºयांना आपल्याच शेतातील शेतमाल शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याची चोरी

रावेर, जि.जळगाव : शेतकरी बांधवांच्या घरात मळणी करून ज्वारीचे उत्पादन घरात येऊनही संगणकीय सातबारा उताºयावर मात्र आॅनलाइन ज्वारी पिकाच्या पेºयाची नोंदणी झाली नसल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांची ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या यंत्रणेने ठेंगा दाखवला असल्याने शेतकरीवर्ग वाºयावर सुटला आहे. एकीकडे शेतकºयांना दुष्काळाच्या झळा बसत असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे शेतकºयांना लढा द्यावा लागत असल्याची बाब शोचनीय असल्याची शोकांतिका व्यक्त होत आहे.शासनातर्फे आधारभूत किमतीवर ज्वारी व मका खरेदी केंद्र्र सुरू करण्यासाठी शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी शेतकºयांना चालू ज्वारी वा मका पीकाचा आॅनलाइन पेरा लावलेला संगणकीय सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकची सत्यप्रत असे दस्तऐवज आवश्यक असल्याचे सूचना देण्यात आल्या होत्या.दरम्यान, तालुक्यातील खानापूरसह अन्य काही महसूल सजांमधील शेतकºयांचे आॅनलाइन संगणकीय सातबारा उताºयावर यंदाच्या खरीप हंगामाचे पीकपेºयांची नोंदणी झाली नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. शेतकºयांची ज्वारी वा मका पिकांची मळणी होऊन दुष्काळाच्या झळा बसलेले जेमतेम उत्पादन घरात येऊनही शासनाच्या आॅनलाइन संगणकीय सातबारा उताºयावर मात्र त्या पिकांच्या पेºयाची नोंद झाली नसल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर नोंदणी करताना तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या यंत्रणेकडून शेतकºयांना नाव नोंदणीच्या रांगेतून बाहेर काढून हाकलून लावण्यात येत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.आॅनलाइन संगणकीय सातबारा उताºयावर संबंधित महसुली सजा तलाठी यांनी सही शिक्क्यानिशी हस्तलिखित ज्वारी वा मका पिकांचा पीक पेरा लावून दिला तरी, हस्तलिखित पीकपेºयांची नोंदणी असलेल्या सातबारा उताºयाची आॅनलाइन नोंदणी करताना स्वीकृती होत नसल्याची बाब सांगून खरेदी विक्री संघाचे संबंधित यंत्रणेकडून ज्वारी वा मका खरेदीच्या नोंदणीसाठी स्पष्ट नकार दिला जात आहे. त्यामुळे आपलाच शेतमाल असताना त्याला विकण्याची शेतकºयाला चोरी झाली असल्याने शेतकरी वर्गातून कमालीचा असंतोष धुमसत आहे.तत्संबंधी काही शेतकºयांनी थेट तहसीलदारांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संबंधित सजा तलाठ्यांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. किंबहुना, संबंधित सजा तलाठी आॅनलाइन पीकपेºयांची नोंदणीला मंडळाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाल्याशिवाय संगणकीय सातबारा उताºयावर आॅनलाइन पेरा नोंदवून देण्यास असमर्थता व्यक्त करीत असल्याने संबंधित शेतकºयांची मोठी कुचंबणा झाली आहे. प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे शेतकºयांना आपल्याच शेतातील शेतमाल शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याची चोरी झाल्याने शेतकरीवर्गातूून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.एकीकडे दुष्काळाच्या झळा बसत असताना शेतकºयांना आपला शेतमाल विकण्यासाठी प्रशासनाशी लढा द्यावा लागत असल्याची बाब शासनाच्या संवेदना बोथट झाल्याची प्रचिती देणाºया असल्याचा सूर संतप्त शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या ज्वारी खरेदी केंद्रावर ज्वारी विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी गेलो असता माज्या आॅनलाइन सातबारा उताºयावर तलाठ्यांनी हस्तलिखित केलेल्या पीकपेºयांची नोंदणी पाहून रांगेतील सोळाव्या क्रमांकावरून मला हाकलून देण्यात आले. खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्यवस्थापनाकडे दाद मागितली त्यांनी असमर्थता व्यक्त केली. सकाळी तहसीलदार कार्यालयात नसल्याने त्यांचे मुख्यालयावर गेलो. त्यांनी गावातल्या तलाठ्याकडे जा. म्हणून परत केले.- दिवाकर बिसन पाटील, ज्वारी उत्पादक शेतकरीआॅनलाईन सातबारा उताºयावर हस्तलिखित पीकपेºयांची नोंदणी केली असली तरी आॅनलाइन खरेदीसाठी नोंदणी करताना स्कॅनिंग करताना तशा प्रकारच्या सातबारा उताºयांची नोंद त्या वेबसाईटवर स्वीकारली जात नसल्याची अडचण आहे.- प्रशांत पाटील, ग्रेडर, ज्वारी खरेदी केंद्र 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर