शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

सत्ताबाह्य केंद्राची महापालिकेत परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 10:55 IST

आमदार भोळेनंतर आता खटोड ठरताहेत केंद्रबिंदू

ठळक मुद्दे महापौरांच्या दालनात होतात बैठका

जळगाव : महानगरपालिकेत सोमवारी शहरातील बांधकाम व्यावसायीक श्रीराम खटोड यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानिमित्ताने मनपात एक नवे सत्ताकेंद्र निर्माण झाले असून, सत्ताबाह्य केंद्राची मनपात परंपरा कायम असल्याचे या प्रकारावरुन दिसून येत आहे. याआधी डॉ.शिवाजी सरोदे, प्रदीप रायसोनी व आमदार सुरेश भोळे हे देखील मनपात कुठल्याही पदावर नसतानाही निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग रहायचा.भाजपाची मनपात सत्ता आल्यानंतर महत्वाच्या निर्णयप्रक्रियेत अनेकजणांचा समावेश दिसून येत आहे. महापालिकेतील प्रमुख निर्णय हे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते, सभागृह नेते हे घेवू शकतात. मात्र, या पदाधिकाºयांच्या ंव्यतिरीक्त आमदार सुरेश भोळे व श्रीराम खटोड हे देखील महत्वाचे व्यक्ती आहेत. आमदार भोळे हे मनपात अधिकाºयांनी बैठका घेवून त्यांना सूचना देखील दिल्या आहेत. मात्र, श्रीराम खटोड यांनी कोणत्याही पदावर नसतानाही त्यांनी घेतलेल्या बैठकीमुळे मनपात नवीन सत्ताकेंद्राचा उदय झालेला दिसून येत आहे.रायसोनींना देण्यात आले अधिकारसध्या श्रीराम खटोड यांच्या सत्ताबाह्य केंद्राची चर्चा असली तरी ही परंपरा मनपात अनेक वर्षांपासून कायम आहे. १९९५ च्या तत्कालीन नगरपालिकेत शहर विकास आघाडीच्या काळात प्रदीप रायसोनी हे नगरपालिकेच्या कोणत्याही पदावर नसतानाही त्यांच्याकडेच सर्व निर्णयप्रक्रिया देण्यात आली होती. याच काळात उच्चधिकार समिती स्थापन करण्यात आली होती व रायसोनींकडे सर्व अधिकार देण्यात आले होते. नगराध्यक्षांना देखील नगरपालिकेचा कुठलाही निर्णय घेण्याआधी रायसोनींशी चर्चा करावी लागत होती. तसेच रायसोनी यांना स्वतंत्र फोन व नगरपालिकेकडूनच गाडी देण्यात आल्यामुळे मोठा वाद देखील त्यावेळी झाला होता.भाजपाच्या काळात डॉ.सरोदेंना देण्यात आले विशेषाधिकार२००१ मध्ये नगरपालिकेत भाजपाचा नगराध्यक्ष झाल्यानंतर भाजपाने देखील शहर विकास आघाडीच्या उच्चधिकार समितीचा कित्ता गिरवत त्यावेळी डॉ.शिवाजी सरोदे हे महत्वाचे निर्णय घेत होते. डॉ. सरोदे हे बांधकाम व्यावसायीक होते तसेच भाजपाच्या विविध पदांवर त्यांनी काम केले. डॉ. के.डी.पाटील नगराध्यक्ष असतानाही महत्वाचा निर्णय घेताना आधी डॉ.सरोदे यांना विश्वासात घेतले जात होते.महत्वाचे निर्णय भोळे, खटोडांच्या सल्ला मसलतीनेमनपात भाजपाची सत्ता नसताना देखील आमदार सुरेश भोळे हे आमदार झाल्यानंतरही विरोधीपक्ष भाजपाच्या नगरसेवकांसाठी सत्ताकेंद्रच होते. दरम्यान, आता मनपात भाजपाची सत्ता असताना मनपातील महत्वाच्या पदाधिकाºयांपेक्षाही सर्व निर्णय प्रक्रियेत आमदार सुरेश भोळे यांनी घेतलेला निर्णय अंतिम ठरत आहेत. महासभेपूर्वी होणाºया बैठकीत आमदार भोळे हेच भाजपाची रणनिती ठरवतात. तसेच अनेकवेळा महापौरांच्या अनुपस्थितीतही आमदार भोळे हे मनपात अधिकाºयांचा बैठकी घेवून त्यांना सूचना देत असल्याचे दिसून आले आहेत. आता श्रीराम खटोड यांनी देखील मनपात येवून अधिकाºयांची बैठक घेवून त्यांना विविध कामांबाबत सूचना दिल्याने आता नवीन सत्ताकेंद्र मनपात निर्माण झाले आहे.मनपाचे अधिकारी व कर्मचारी संभ्रमावस्थेतमनपा अनेक सत्ताकेंद्र तयार झाल्यामुळे मनपातील अधिकारी संभ्रमावस्थेत दिसून येत आहेत. प्रशासकीय सूचनांसह, दैनंदिन कामकाज व आमदार, महापौर, नगरसेवक, इतर पदाधिकाºयांव्यतिरीक्त इतर सत्ताकेंद्रातील व्यक्तींकडूनही त्यांना सूचना दिल्या जात असल्याने मनपा कर्मचाºयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक अधिकारी सेवानिवृत्तीला अजून एक किंवा दोन वर्ष शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्तीची तयारी करताना दिसून येत आहेत. अनेक अधिकारी व कर्मचाºयांना खासगीत बोलताना ही माहिती दिली.