शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

जळगाव येथे पाच रुपयांच्या नोटा घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 13:12 IST

गैरसमज : चांगल्या स्थितीतील नोटाही घेत नसल्याने ग्राहक संभ्रमात

ठळक मुद्दे10 रुपयांच्या नाण्यांपाठोपाठ पाचच्या नोटास नकारहोलसेल विक्रेते घेत नसल्याची सबब

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14 -  शहरातील विविध भागात पाच रुपयांच्या चलनी नोटा घेण्यास नकार दिला जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दहा रुपयांच्या नाण्यांपाठोपाठ आता पाच रुपयांच्या नोटा घेतल्या जात नसल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. पाच रुपयांच्या नोटा जुन्या होऊन खराब झाल्या आहेत. या खराब व फाटलेल्या नोटा सहसा कोणी घेत नाही. मात्र आता तर या खराब नोटांसह शहरातील संतोषीमाता नगर, एमआयडीसी परिसर, कुसुंबा तसेच शहरातील इतर भागात विक्रेते चांगल्या स्थितीतीलही पाच रुपयांच्या नोटा  घेण्यास नकार देत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. 

होलसेल विक्रेते घेत नसल्याची सबबनोटा घेण्यास नकार देण्या:या विक्रेत्यांना याबाबत ग्राहकांनी विचारले असता आम्ही जेथून माल आणतो ते आमच्याकडून पाच रुपयांच्या नोटा घेत नाही. त्यामुळे आम्ही त्या स्वीकारत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. काही जण तर आम्हीच सरकार आहोत, नोटा घ्यायच्या की नाही ते आम्हीच ठरवू, असे उत्तर देत असल्याचेही सांगण्यात येत आहे. 

काही ठिकाणी प्रत्यक्ष विचारणा केली असता काही दुकानदारांनी सांगितले की, एखादी नोट असेल तर ती द्या, त्यापेक्षाजास्त घेत नाही. तर काही जण म्हणत होते, नोटा बंद नसल्या तरी त्या कोणी घेत नसल्याने आम्हीही घेत नाही.

नवीन नोटा बाजारात नाहीच पाच रुपयांच्या नवीन नोटा बाजारात येत नसल्याने मुळातच त्यांचा तुटवडा असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे ज्या नोटा आहे, त्या हाताळून जास्त खराब होतात. दिवाळीच्या काळात नवीन नोटा आल्या तरी त्या काही मोजकी मंडळीच बँकांमधून घेऊन जात असतात व त्या त्यांच्याकडेच राहतात. त्या चलनात न आणल्याने तुटवडा भासतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

10 रुपयांच्या नाण्यांपाठोपाठ पाचच्या नोटास नकारकाही महिन्यांपूर्वी बाजारपेठेत 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार दिला जात होता. हे नाणे चालत नाही, अशी अफवाही त्या वेळी पसरविण्यात आली. मात्र हे नाणे घेण्याबाबत स्पष्टीकरण झाल्याने नाणे स्वीकारले जाऊ लागले. त्या नंतर आता पाच रुपयांच्या नोटांबाबत नकार दिला जात असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. 

पाच रुपयांच्या नोटा आम्ही तर स्वीकारत आहे. त्या चलनात असून त्या सर्वानी स्वीकारल्या पाहिजे. - ललित बरडिया, सचिव, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ