चाळीसगाव : यंदा राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. अशा गंभीर परीस्थितीत रासायनिक खंताच्या प्रत्येक बॅग मागे २०० रुपयानी भाव वाढविण्यात आला असुन तात्काळ ही दरवाढ कमी करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांसोबत रयत सेना आमरण उपोषण करेल, असा ईशारा रयत सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत २९ रोजी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्रालयातही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.येत्या एक महिन्यात शेतकरी राजापेरणी करणार आहे. त्यांना बि -बियाणे व खते लागणार असल्याने ऐन मौसमात खतांची टंचाई भासू नये म्हणून बरेच शेतकरी हे रासायनिक खतांची आगोदर खरेदी करून घेतात. आज स्थितीत कुठल्याही शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नाही. शेतकरी कर्ज काढून अथवा व्याजाने पैसे घेऊन तर काही शेतकरी पत्नीच्या अंगावरील थोडके असलेले दागिने मोडून तो खर्च शेतावर करतात. वाढलेल्या दरात रासायनिक खंते घेणे न परवडणारे नाही.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनस्तरावरून रासायनिक खताचे भाव कमी करावेत व शेतकºयांना दिलासा द्यावा. असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल.निवेदनावर संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, युवक जिल्हा अध्यक्ष आकाश धुमाळ, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष योगेश पाटील, शिक्षक सेना शहर अध्यक्ष सचिन नागमोती, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, शहर कार्याध्यक्ष सुनिल निंबाळकर, विभाग प्रमुख गोपाल देशमुख व मोनल पाटील, सुनिल जाधव, अमोल पाटील, राजेश पाटील, मधुकर चव्हाण, छोटू अहिरे, रवींद्र मांडोळे, विक्की गायकवाड, मंगेश देठे, स्वप्निल गायकवाड, गौरव पाटील, अनिकेत शिंदे, सागर चव्हाण, विकास पवार, सागर पाटील आदींच्या सह्या आहेत.
रासायनिक खतांच्या किमती कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:27 IST