जि.प.त शुकशुकाट
जळगाव : पंधरा टक्के उपस्थितीचे निर्बंध असल्याने जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतींमध्ये अगदी बोटांवर मोजण्याइतके कर्मचारी उपस्थित राहत असल्याने शुकशुकाट असतो. अनेक विभागांत कर्मचारी नसल्याने कामे रखडत असल्याचेही चित्र आहे. सदस्यांची संख्याही घटल्याने ही स्थिती आहे.
सक्रिय रुग्ण घटले
जळगाव : जिल्हाभरातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यात शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ही ८०० वर आलेली असून, केवळ भुसावळा तालुक्यात १ हजार सक्रिय रुग्ण आहेत. अन्य सर्व तालुके हे एक हजाराच्या खाली असल्याने दिलासादायक वातावरण आहे. अनेक कोविड सेंटर बंदही करण्यात आले आहेत.
म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण
जळगाव : म्युकरमायकोसिसचा आणखी एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या दहा झाली आहे. या रुग्णांना स्वतंत्र कक्ष ७ मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आपत्कालीन स्थितीत या रुग्णांच्या उपचारासाठी औषधी जीएमसीला प्राप्त झाल्याची माहिती आहे.