शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

पाचोऱ्यात लालपरी रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 15:22 IST

एसटीचे उत्पन्नात दिवसागणिक सुधारणा होत आहे.

ठळक मुद्देएसटीची वाहतूक पूर्ववतपुणे, बोरिवली, सुरत, कल्याण या गाड्यांना चांगला प्रतिसाद

श्यामकांत सराफपाचोरा : गेल्या सात महिन्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन झाल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद होऊन एसटीचे जीवन विस्कळीत झाले होते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून एसटीची वाहतूक हळूहळू सुरू होऊन आजच्या स्थितीत पाचोरा आगारातून प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. लालपरी रुळावर आली असून, लांब पल्ल्याच्या गाड्या प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादाने सुरू झाल्या आहेत. यामुळे एसटीचे उत्पन्नात दिवसागणिक सुधारणा होत आहे.पाचोरा आगारात ४४ प्रवासी गाड्या सुस्थितीत असून, ५ मालवाहतूक गाड्या तैनात आहेत. आगारातून दररोज १५२ फेऱ्या साधारण १६ हजार ३९२ किलोमीटरचा प्रवास करून दैनंदिन उत्पन्न सरासरी ३ लाख ३० हजारापर्यंत मिळविण्यात आगाराला यश आले आहे. आगाराचे दैनंदिन सरासरी उत्पन्नात सद्य:स्थितीत ३० टक्के घट असली तरी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करून उत्पन्नात वाढ करण्यात येत आहे.आगाराचे मासिक उत्पन्न सरासरी दीड कोटीचे आहे, मात्र कोरोणानंतर अनलॉक कालावधीत सप्टेंबर ३३ लाख, ऑक्टोबरमध्ये ६० लाखापर्यंत मासिक उत्पन्न आले, तर नोव्हेंबरमध्येही स्थिती चांगल्याप्रकारे सुधारत असल्याचे आगार व्यवस्थापक देवेंद्र वाणी यांनी सांगितले.आगारास मालवाहतुकीतून दरमहा सुमारे पाच लाखाचे उत्पन्न मिळते. आगाराला ४८ शेड्युल मंजूर असून सध्या ४४ शेडूल सुरू आहेत. पाचोरा आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्यांना चांगला प्रतिसाद आहे. पाचोरा -पुणे ४ फेऱ्या यात सकाळी ७ वाजता भडगाव नगर मार्गे पुणे, ७.३० घाटनांद्रा औरंगाबाद मार्गे पुणे, ८.३० वाजता भडगाव मालेगाव मार्गे पुणे, तर ९ वाजता भडगाव संगमनेर मागे पुणे, अशा फेऱ्या सुरू करण्यात आले आहेत, तर पाचोरा- कल्याणच्या २ फेऱ्या सकाळी ८ व ९ वाजता नियमित सुरू झाल्या आहेत. पाचोरा-सुरत ह्यादेखील २ फेऱ्या सकाळी ८ व ११ वाजता सुरू केल्या आहेत. असून पाचोरा -बोरीवली सकाळी ६.३० पाचोरा-नंदुरबार सकाळी ७, पाचोरा-औरंगाबाद ८.३० अशा असून पाचोरा-मालेगाव ९ फेऱ्या आहेत. पाचोरा-नाशिक दुपारी १२.३० असल्याने प्रवाशांना रेल्वेची वाट पाहण्याची गरज नाही. यामुळे व्यवस्थापकांनी जादा गाड्यांचीसुद्धा व्यवस्था केली आहे.बसस्थानकाचे नूतनीकरणही केले आहे. मात्र या ठिकाणी अद्याप काही काम अपूर्ण अवस्थेत असून आगार यार्डात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. बसस्थानकाच्या आवारात घाणीचे साम्राज्य असल्याने स्वच्छतेकडे लक्ष देऊन आगाराच्या मोकळ्या मैदानात वृक्षारोपण, बगीच्या फुलवावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात अद्यापही एसटीची वाहतूक सुरळीत झाली नसून प्रवाशांचा ओघ कमी आहे यामुळे ्रामीण भागात फेर्‍या वाढविण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांनी एसटीतून प्रवास करावा व एसटीची मागणी केल्यास फेऱ्या वाढविण्यात येतील, अशी माहिती स्थानकप्रमुख तिवारी यांनी दिली.

टॅग्स :GovernmentसरकारPachoraपाचोरा