जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जागतिक डॉक्टर दिनानिमित्त जळगाव शहरातील डॉक्टरांचा जिल्हाधिकारी व रेडक्रॉस अध्यक्ष अभिजित राउत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर दिनानिमित्त पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ.राजेश पाटील, डॉ.जितेंद्र कोल्हे, तसेच रेडक्रॉस रक्त केंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तकेंद्र सचिव डॉ.अपर्णा मकासरे,अनिल शिरसाळे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सहसचिव राजेश यावलकर, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, धनंजय जकातदार, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, उज्ज्वला वर्मा उपस्थित होते.
सर्व गरजुंना नॅट टेस्टेट रक्तच मिळावे, अशी अपेक्षा रेडक्रॉसतर्फे व्यक्त करण्यात आली. तर आयएमएचे सचिव ड़ॉ. राधेश्याम चौधरी यांनी रेडक्रॉससोबत नॅट तंत्रज्ञानाचे महत्त्व प्रत्येक डॉक्टरांपर्यंत पोहचवण्यासाठी आयएमए कटिबद्ध असल्याचेही आश्वासन दिले.