शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील ट्रान्सपोर्ट नगरात १५ कोटीच्या थकीत वसुलीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:44 IST

भाडे निश्चितीची फाईल तपासली

जळगाव : मनपा मालकीच्या ट्रान्सपोर्ट नगरातील भाड्याने देण्यात आलेल्या जागेच्या वसुलीबाबत मनपा विधीतज्ज्ञांकडून अभिप्राय घेणार असल्याची माहिती किरकोळ वसूली विभागाच्या सूत्रांनी दिली. मनपाने बजावलेल्या ८१ ब च्या नोटीसवर ट्रान्सपोर्ट नगर असोसिएशनने न्यायालयाकडून स्थगिती आणली होती. मात्र, आता ही स्थगिती उठली असल्याने मनपाकडून वसुलीबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.शहराच्या हद्दीतील ट्रान्सपोर्ट नगर भागात मनपाने ट्रान्सपोर्ट नगर असोसिएशनला भाडे पट्ट्याने दिलेल्या जागेची मुदत १९९८६ मध्येच संपली असून, १९८६ ते २०१९ दरम्यान कोणतीही वसुली मनपाकडून झालेली नाही. जागेच्या बदल्यात १५ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून, ही रक्कम वसूल करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. २०१५ मध्ये ट्रान्सपोर्ट नगर असोसिएशनने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून मूदत वाढविण्याची मागणी केली होती. मात्र, जिल्हा न्यायालयाने याचिका फेटाळून मनपाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर ट्रान्सपोर्ट नगर असोसिएशन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर महिनाभर स्थगिती आणली होती. ती स्थगितीची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.नगररचना विभागाची दिरंगाईमुदत संपल्यावर भोगवटा कालावधीसाठी रेडीरेकनर प्रमाणे भाडे आकारून २ टक्के शास्ती लावण्याचा मनपाचा ठराव व शासन निर्णय आहे. त्यानुसार मनपाने इतर व्यापारी संकुलातील अनधिकृत भोगवटाबाबत संबधितांना बिले देण्यात आली आहेत. तशी बिले ट्रान्सपोर्ट नगरात द्यायला हवी होती. मात्र, ट्रान्सपोर्ट नगरातील जागेच्या भाडे आकारणीचा दर निश्चित करण्यासाठी किरकोळ वसुली विभागाकडून नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अनंत धामणे यांच्याकडे जून २०१८ मध्ये फाईल पडली होती.‘लोकमत’ ने ५ एप्रिल रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगररचना विभागाने तत्काळ फाईल तपासून किरकोळ वसुली विभागाकडे रवाना केली आहे.मनपा अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभावनगररचना विभागाने ट्रान्सपोर्ट नगरातील जागेच्या भाडे निश्चितीबाबतच दर निश्चित केले नसल्याने धामणे यांना विचारले असता, १९८६ ते २००० व २००१ ते २०१८ पर्यंतच्या भाडे निश्चितीबाबतची फाईल अनेक महिन्यापूर्वी तपासून किरकोळ वसुली विभागाकडे दिली असल्याचे सांगितले. तर किरकोळ वसुली विभागाचे अधीक्षक नरेंद्र चौधरी यांना विचारले असता, आपल्याकडे गेल्या आठवड्यातच नगररचना विभागाकडून ती फाईल आली असल्याची माहिती दिली. यावरून मनपा अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असून याबाबतची माहिती लपविली जात असल्याचे आढळून येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव