शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

वसुलीची कारवाई शेतशिवारात धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 22:49 IST

कोळगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १२ गावांच्या शेतशिवारातील जवळजवळ १८ ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद केला आहे.

ठळक मुद्देकोळगाव वीजउपकेंद्रातंर्गत शेती रोहित्र वीजपुरवठा तोडण्याचा सपाटा

लोकमत न्यूज नेटवर्क

खेडगाव, ता. भडगाव : शेतकऱ्यांकडे कृषिपंपांची असलेली थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने कोळगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १२ गावांच्या शेतशिवारातील जवळजवळ १८ ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद केला आहे. यामुळे ऐन रब्बी हंगामात सिंचनाअभावी पीक व शेतकरी संकटात सापडला आहे.या आठवड्यात जुवार्डी, गुढे, आडळसे, पथराड, सावदे, कोळगाव, पिंप्रीहाट, शिंदी-पेंडगाव, खेडगाव, शिवणी व बात्सर या गावातील शेती ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने तोडला जात आहे. रविवारपर्यंत १८ ट्रान्सफाॅर्मर बंद करण्यात आले. यातील सावदे शिवारातील  दोन ट्रान्सफाॅर्मरवरील शेतकऱ्यांनी तीन टप्प्यात पैसे भरणे चालू केल्याने त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत जोडण्यात आल्याची माहिती महावितरण सूत्रांनी दिली.

महावितरणच्या या मोहिमेमुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. हा परिसर गिरणाकाठ व जामदा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात येतो. यंदा पावसाळादेखील चांगला झाल्याने रब्बीत सर्वत्र गहू, हरभरा, ज्वारी व मका हे पीक घेतले जात आहे. रब्बी-उन्हाळी असा हंगाम माध्यान्ह ते शेवटच्या टप्प्यात आहे. ऐन हातीतोंडी घास येण्याच्या स्थितीत वीजपुरवठा तोडण्यात आल्याने, शेतकरी सैरभैर झाला आहे. काही शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे तर हंगाम शेतात उभा आहे. आजच वीजबिल थकबाकी भरण्याची आर्थिक स्थिती नाही. हंगाम निघेपर्यंत तरी यात मुभा मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी नवीन ऐजी पंप योजनेनुसार मागील काही वर्षांची थकीत बाकीवरील व्याज, दंड, आकार अशी सवलत देत कमी आकारणीचे वीजबिले आली आहेत. ही वीजबिले एकरकमी किंवा तीन टप्प्यांपर्यंत भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मार्चपर्यंत या वीजबिले भरावयाची आहेत. यानुसार एकेका रोहित्रावर काही वीजबिले भरली जावीत, असा आग्रह सुरू आहे. यामुळे रोहित्रावरचा वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांना पाच-सहा लाख ते एक-दीड लाखांपर्यतची वीजबिले एक-दीड लाख ते सत्तर-ऐंशी हजारांपर्यंत या योजनेत कमी होऊन आली आहेत. ती भरण्यासाठी ही मोहीम सुरू आहे.शेतकऱ्यांनी तीन अश्वशक्तीचा पंप असताना, महावितरणने अवाच्या सवा अशी व पाच हाॅर्सपाॅवरचे वीजबिल आकारुन मागील पाच-सहा वर्षाची बिले पाठविले आहेत. हा भुर्दंड शेतकऱ्यांना का? आम्ही जास्तीचे बिले का? भरायची? असा त्यांचा सवाल आहे. ही बिले कमी करून तीन अश्वशक्तीचीच बिले आम्हाला मिळावीत, तरच आम्ही वीज बिले भरू, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वीजबिल भरा, मगच कमी करून मिळेल 

 महावितरणचे अधिकारी आधी, वीजबिल भरा मग मागून वीज बिले कमी करून मिळतील, असे स्पष्टीकरण यावर देत आहे. वीज बिल थकबाकी भरण्याचे आवाहन करीत, वीजपुरवठादेखील तोडला जात आहे. आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे अन्यथा असंतोष निर्माण होत आहे.

शेतकऱ्यांकडील वीज तोडण्याची कारवाई 

जामनेर : जामनेर तालुक्यात ११ हजार  शेतकऱ्यांकडे सुमारे १६३ कोटीची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी शेतकऱ्यांकडील  वीजपुरवठा तोडण्यास ग्रामीण भागात सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात असतांना कोणतीही पुर्वसुचना न देता विज पुरवठा खंडीत केला जात आहे.  मात्र कारवाई करताना विज वितरण कंपनीकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप होत आहे.जामनेर तालुक्यात ११ हजार ४०० शेतकऱ्यांकडे सुमारे १६३ कोटीची थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागडे यांनी दिली.कोरोना संकटामुळे विज बील माफी मिळेल अथवा त्यात सुट मिळेल या आशेवर असलेल्यांनी बिलाची रक्कमच भरली नाही. काही शेतकऱ्यांकडे १० वर्षापुर्वीची थकबाकी असल्याचे विज वितरण कंपनीतील अभियत्यांचे म्हणणे आहे. यामुळे थकबाकीदारांची संख्या व रक्कम वाढली आहे.पहुर, फत्तेपुर, नेरी, मालदाभाडी व जामनेर परिसरात विज पुरवठा तोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांकडे राजकीय नेत्यांकडे धाव घेत कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे १६३ कोटीची थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांकडे संख्या ११ हजार ४०० आहे. थकबाकी भरणे बाबत सहाय्यक अभियंत्यांनी ठिकठिकाणी बैठका घेवून माहीती दिली आहे. -शैलेंद्र बागडे, उपकार्यकारी अभियंता, जामनेर 

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावJamnerजामनेरmahavitaranमहावितरण