प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोरोना योद्ध्यांसह मात केलेल्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:17 AM2021-01-25T04:17:38+5:302021-01-25T04:17:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापनदिनानिमित्त २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता पोलीस कवायत मैदानावर ...

Reconciliation with the Corona Warriors at the Republic Day celebrations | प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोरोना योद्ध्यांसह मात केलेल्यांचा सत्कार

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोरोना योद्ध्यांसह मात केलेल्यांचा सत्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापनदिनानिमित्त २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. यावेळी कोरोना योद्ध्यांसह या आजारावर मात केलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहिद जवानांच्या पत्नी, आई-वडील, डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक अशा कोरोनायोध्दांसह या आजारावर मात केलेले काही नागरिक तसेच जळगाव शहरातील मर्यादित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

प्रभातफेऱ्या व सांस्कृतिक कार्यक्रम अजूनही रद्द

मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी २६ जानेवारीला सकाळी ८.३० ते १० वाजेदररम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध-शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० च्या पूर्वी किंवा १० वाजल्यानंतर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांसाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रभातफेऱ्या काढण्यात येऊ नये तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: Reconciliation with the Corona Warriors at the Republic Day celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.