शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
4
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
5
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
6
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
7
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
8
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
9
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
10
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
11
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
12
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
13
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
14
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
15
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
16
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
17
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
18
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
19
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
20
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पीएच.डीच्या सुधारित नियमावलीला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 8:55 PM

पीएच.डी. मध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुधारीत मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. या मसुद्याला मंगळवार २४ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ठळक मुद्देविद्या परिषदेच्या बैठकीत निर्णयसलग दोन सहामाही प्रगती अहवाल जमा न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार पत्रनव्या मसुद्यात सुमारे २० मुद्यांचा समावेश

जळगाव : पीएच.डी. मध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुधारीत मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. या मसुद्याला मंगळवार २४ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नवीन मसुद्यात सुमारे २० नवीन मुद्यांचा समावेश आहे.कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विद्या परिषदेची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून मान्यता देण्यात आली. पीएच.डी. मध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालावर विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली समितीने सुचविलेल्या सुधारीत मसुद्याला मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता एखाद्या संशोधक विद्यार्थ्याने सलग दोन सहामाही प्रगती अहवाल जमा केले नसतील तर त्याला पत्र देण्यात येईल. त्यानंतरही संबंधित विद्यार्थ्याने सलग तीन सहामाही प्रगती अहवाल जमा केले नाहीत तर विद्यार्थ्याच्या मार्गदर्शकाला पत्र देवून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचा पीएच.डी साठीचा प्रवेश प्र-कुलगुरुंच्या मान्यतेने रद्द करण्यात येईल. एखाद्या संशोधक विद्यार्थ्याच्या संशोधनाच्या संक्षिप्त रुपरेषेमध्ये आरआरसी समितीने दुरुस्ती सुचविल्यानंतर विद्यार्थ्याने दुरुस्त केलेली संक्षिप्त रुपरेषा पुन्हा आरआरसीच्या सभेत मंजूरीसाठी ठेवण्याची आवश्यकता नाही. त्या-त्या विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांना संशोधन विभागाकडून दाखविण्यात येईल व त्यांची मंजूरी घेण्यात येईल. विद्यार्थ्याला ज्या तारखेला मार्गदर्शक देण्यात आला आहे तिच तारीख पीएच.डी नोंदणीची तारीख असेल. अशा जवळपास २० मुद्यांचा समावेश या नव्या मसुद्यात करण्यात आला आहे.कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी चॉईस बेसड् क्रेडिट सिस्टीमबाबत जिल्हावार प्राध्यापकांच्या कार्यशाळा घेतल्या जातील. कोणत्याही प्राध्यापकांचा वर्कलोड कमी होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी माहिती दिली.बैठकीत विद्यापीठाचे सर्व निकाल निर्धारित कालावधीच्या आत व चांगले लागल्याबद्दल तसेच विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणाच्या निवडणूका इतर विद्यापीठांच्या आधी शांततेत व पारदर्शीपणे पार पडल्याबद्दल कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक आणि प्रशासनाचे अभिनंदन करणारा ठराव प्राचार्य एस.आर.जाधव यांनी मांडला. या ठरावाला प्राचार्य प्रमोद पवार यांनी अनुमोदन दिले. विद्या परिषदेने हा ठराव एकमताने मान्य केला. कुलसचिव भ.भा.पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव