शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तिस-या पर्वात लागणार खरी कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:11 IST

रेड झोनमधून बाहेर पडण्याचे जळगाव, धुळ्यापुढे आव्हान, मजूर परतू लागल्याने नंदुरबारपुढे आॅरेंज झोन टिकविण्याची कसोटी, निर्बंध आणि शिथिलीकरणाच्या पेचात अडकले प्रशासन

मिलिंद कुलकर्णी

लॉकडाऊनचे तिसरे पर्व सुरु झाले. ४० दिवस घरात अडकून पडलेल्या नागरिकांना दिलासादायक बातमी सध्या तरी नाही. उलट प्रकोप वाढत चालला आहे. खान्देशचा विचार केला तर जळगाव आणि धुळे हे जिल्हे ‘रेड झोन’मध्ये समाविष्ट झाले आहेत. नंदुरबार सध्या आॅरेंज झोनमध्ये असला  तरी आता मध्य प्रदेश आणि गुजरातमधून स्थानिक रहिवासी परत येऊ लागल्याने या झोनचे अस्तित्व कसे राहते, हे बघायला हवे.खान्देशातील बाधित रुग्णांची संख्या शंभरीपर्यंत भिडली आहे. त्यापैकी १९ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मृत्यू दर अधिक असल्याची आरोग्य क्षेत्रातील मंडळींची तक्रार आहे. मुंबई, पुणे आणि मालेगाव येथून आलेल्या रहिवाशांमुळे खान्देशात कोरोनाची बाधा अधिक झाली.  २५ मार्चपासून लॉक डाऊन पाळले जात असताना जिल्हाबंदी कठोरपणे अंमलात आणली नाही. त्याचा फटका बसला. सामान्य आजाराच्या रुग्णांना तपासणारे दोन-तीन डॉक्टर बाधित झाले. मालेगावला बंदोबस्तासाठी गेलेले पोलीस कर्मचारी बाधित झाले. याचा अर्थ सरळ आहे, पुरेशी खबरदारी बाळगली गेली नाही. सुरक्षा उपकरणे दिली गेली नसावी किंवा असतील तर ती वापरली गेली नाहीत. बेपर्वाई जीवावर बेतू शकते, हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे.लॉकडाऊनचे तिसरे पर्व नागरिकांच्या संयम आणि सहनशिलतेची कसोटी पाहणारे राहील. या काळात जो काळजी घेईल, तो कोरोनावर मात करेल. महागाईने कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू लागली आहे. दुकानात गेले आणि वस्तू मिळाली असे आता होत नाही. अमूक नाहीये, ते शिल्लक नाही, असा सार्वत्रिक अनुभव आहे. यातून त्रस्तता वाढेल. स्वस्त धान्य दुकानातून केशरी पत्रिकाधारकांना धान्य मिळत आहे. पण त्यासाठी आधार लिंक वगैरे विषय आहेत. दुकानात गेल्यावर नियम सांगितले जातात. तहसील कार्यालयात अपुºया मनुष्यबळामुळे दादपुकार घेतली जात नाही. हे आणखी वाढत जाईल.जिल्हा प्रशासनावरील कामाचा ताण आणखी वाढणार आहे. परराज्यातील मजुरांना परत पाठविण्याचा निर्णय झाल्यानंतर लगेच परवान्यासाठी गर्दी झाली. आरोग्य तपासणी करुन कुणालाही परत पाठवता येणार नाही किंवा जिल्ह्यात घेता येणार नाही. नियमित रुग्णांच्या तपासणीसोबत आता या मजुरांच्या, प्रवासी व्यक्तींच्या तपासणीचा ताण वाढणार आहे.अन्नधान्य, भोजन पाकिटे, मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू पुरविण्यासाठी ४० दिवस स्वयंसेवी, सामाजिक संस्था अखंडपणे झटत आहेत. त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आता समाज आणि प्रशासन अशा दोघांची आहे. अपेक्षा वाढणार आहे, त्यासोबत देणाºयाचे हात देखील वाढायला हवे. तरच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी तिसºयांदा वाढला. कोरोनाच्या दहशतीसोबत जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, महागाईचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मजुरांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आता विद्यार्थ्यांचा प्रश्न उरला.शैक्षणिक क्षेत्रासाठी काय तोडगा निघतोयाकडे समस्त विद्यार्थी आणि पालकवर्गाचे लक्ष लागले आहे. प्राथमिक विभागाचा प्रश्न नाही, पण माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन परीक्षांसंबंधी काय निर्णय होतो आणि त्याची अंमलबजावणी कशी होते, हे बघायला हवे. आॅनलाईन की आॅफलाईन हा प्रश्न जसा आहे, तसेच शारीरिक दूरत्व, यातायात सेवा हे सगळे सांभाळावे लागणार आहेच. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव