आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.६ - दरवर्षी ७ ते १४ फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाईन सप्ताह साजरा केला जातो. या प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात बुधवारपासून ‘रोझ डे’ने होत आहे.त्याची तयारी आतापासूनच युवावर्गाने केली असून, भेटवस्तू, शुभेच्छापत्रांसाठी जळगावची बाजारपेठही सजली आहे.बाजारात ‘आय लव्ह यू’ अक्षर असलेल्या चॉकलेट गिफ्ट मिळत आहेत. तसेच चॉकलेट्सचे खास बुकेही आले आहेत. केक, पुडिंग, पेस्ट्रीज, आईसक्रीम्सवरदेखील तरुणाई खर्च करणार आहे. त्यानंतर लाल रंगात व वेगवेगळ्या प्रकारातील टेडीजलाही मागणी वाढली आहे.सोशल नेटवर्किंगवरलाही प्रेमाचा बहरव्हॅलेंटाईन वीक साठी तरुणाईकडून जोरदार तयारी सुरु असताना, डिजीटल काळात सोशल नेटवर्किंगवर देखील प्रेमाचा संदेशाचा बहर आला आहे. अनेक युवक प्रेमावर आधारीत कविता एकमेकांना पाठवित आहेत. तसेच अनेकजण आपले व्हॉटस्अॅप स्टेटस अपडेट करण्यात व्यस्त आहे.
जळगावातील तरुणाई ‘व्हॅलेंटाईन’ साठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 17:03 IST
जळगावातील गिफ्ट हाऊसमध्ये युवक-युवतींची गर्दी
जळगावातील तरुणाई ‘व्हॅलेंटाईन’ साठी सज्ज
ठळक मुद्देसोशल नेटवर्किंगवरही प्रेमाचा बहरबाजारात आले ‘आय लव्ह यू’ अक्षर असलेल्या चॉकलेट गिफ्टलाल रंगातील व वेगवेगळ्या प्रकारातील टेडीजलाही मागणी