शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा माऊली संवाद : आदेश बांदेकर यांच्यासमोर महिलांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 12:31 IST

भाऊजी नव्हे बंधू बनून आलेल्या आदेश बांदेकर यांच्याकडे महिलांनी केल्या विविध तक्रारी

जळगाव : महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्य, शिक्षण असे अनेक प्रश्न असून ते आता तुम्हीच सोडवा, अशी मागणी करीत जळगावातील महिलांनी समस्यांचा पाढाच दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेले मराठी अभिनेते तथा शिवसेनेचे सचिव आणि मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे केली. शिवसेनेच्या ‘माऊली संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊजी नव्हे तर बंधू बनून आलेल्या बांदेकर यांच्याकडूनच आता अपेक्षा असल्याचे महिलांनी बोलून दाखविले.शिवसेनेच्यावतीने आयोजित ‘माऊली संवाद’ कार्यक्रमासाठी बांदेकर हे जळगावात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलावर्गाने या कार्यक्रमात त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करत महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा विषयांवर आपल्या अडीअडचणी मांडल्या. शिवसेनेच्यावतीने याप्रश्नी शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन बांदेकर यांनी यावेळी दिले. या वेळी त्यांच्यासोबत मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ, शीतल म्हात्रे, संजना गाडी, आशा मामेडी यादेखल उपस्थित होत्या.बचतगटासाठी बाजारपेठ हवीयात बांदेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्यावतीने राज्यभरातील महिलांचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘माऊली संवाद यात्रे’चे आयोजन केले आहे. तुम्ही आपल्या समस्या निर्भीडपणे मांडा, असे आवाहन बांदेकर यांनी केले. यावेळी बहुसंख्य महिलांनी रोजगाराचा मुद्दा मांडला. आम्ही बचतगट चालवतो. मात्र, हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने आम्हाला अडचणी येतात. त्यामुळे बाजारपेठ मिळाली तर आम्ही स्वावलंबी होऊ शकतो. आम्हाला स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिलांनी केली.महिला सुरक्षेकडे वेधले लक्षराज्यभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव शहरातदेखील महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणीदेखील यावेळी महिलांनी बांदेकर यांच्याकडे केली. त्यावर बांदेकर यांनी याप्रश्नी लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. शहरातील मूलभूत सुविधा, महिलांचे आरोग्य तसेच शिक्षण या विषयांवरही काही महिलांनी अडचणी मांडत त्यावर मार्ग काढण्याची विनंती केली.खेळामध्ये रमल्या महिलाकार्यक्रमात प्रश्नोत्तरे आटोपल्यानंतर आदेश बांदेकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित काही महिलांना मंचावर बोलावून खेळ घेतले. त्यात महिला चांगल्याच रमल्या होत्या.कार्यक्रमाचा मनमुराद आनंद महिलांनी लुटला.कार्यक्रमाच्या शेवटी सैराट चित्रपटातील‘झिंग झिंग झिंगाट...’या गीतावर उपस्थित महिलांनी नृत्य केले.यावेळी बांदेकर यांनीही ठेका धरला.

टॅग्स :Jalgaonजळगाव