शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यात तीन ठिकाणी सट्टा पेढ्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:30 IST

रावेर तालुक्यातील खानापूर येथे तब्बल दीड ते दोन वर्षांपासून बंद पडलेल्या मटका जुगाराच्या अवैध धंदेवाईकांनी पुन्हा डोके वर काढल्याने शनिवारी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाने येथे येऊन दुपारी खानापूर व वाघोड येथे अचानक धाड टाकून सट्याबेटींग घेणाऱ्या बºहाणूपर बेटींग घेणाºया मालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे१४ जणांविरुद्ध गुन्हा दाखलखानापूर, वाघोड व रावेर येथे सट्ट्यावर संक्रांतवाघोड येथे देशी दारू दुकानावर धाड

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील खानापूर येथे तब्बल दीड ते दोन वर्षांपासून बंद पडलेल्या मटका जुगाराच्या अवैध धंदेवाईकांनी पुन्हा डोके वर काढल्याने शनिवारी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाने येथे येऊन दुपारी खानापूर व वाघोड येथे अचानक धाड टाकून सट्याबेटींग घेणाऱ्या बºहाणूपर बेटींग घेणाºया मालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या धाडीत खानापूर येथून ९, वाघोड येथील एक व रावेर येथील एक अशा ११ आरोपींना अटक करून १५ हजारांची रोकड व साहित्य पोलिसांनी जप्त केले.खानापूर येथील सप्तशृंंगी नगरातील एका टपरीच्या आडोशाला सट्टा जुगाराचा खेळ खेळवणाºया आरोपी शेख लूकमान शेख चाँद (वय ४५) , शेख आरीफ शेख कमरोद्दीन (वय ४१) , शेख सुल्तान शेख चाँद (वय ३२) व मालक सुनील महाजन चौघे रा.खानापूर, ता.रावेर व सट्टा खेळण्यासाठी बºहाणपूर येथून आलेले खुर्शीद शे अहमद (वय ३६), मोहंमद जाकीर मोहंम्मद जहीर (वय २८), मोहंमद हारूण शफीउल्लाह (वय ४०), जाकीर अली अब्बास अली (वय २८), भुरा मोहन बारेला (वय ३०), मोहंमद हारूण मोहम्मद फारूख (वय ३५) यातील नऊ आरोपींना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून ११ हजार ४३० रोकड व सट्ट्याचे साहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अरूण सुभाष राजपूत यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाघोड येथे कारवाईदरम्यान, वाघोड येथील बसस्टँडवरून नगीनदास कडू महाजन यांच्या जवळ सट्ट्याचे साहित्य व चिठ्ठ््या तथा २ हजार ५३० रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यांच्यासह मालक शाहीद यांच्याविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अरूण सुभाष राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, रावेर पोलिसांनी शहरातील शेख जाकीर शेख शब्बीर (वय ४०) रा इमामवाडा रावेर याच्याकडून सट्टाबेटींगचे साहित्य व ७१० रोख रक्कम जप्त करण्यात आली. पो. कॉ. सुरेश मेढे यांचे फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच वाघोड येथील मगन महाजन यांच्या हॉटेलसमोर एका टपरीवर ७५० किमतीच्या देशी दारूच्या १५ बाटल्या अवैधरीत्या विक्रीसाठी बाळगताना आढळून आल्या. पो.का.ॅनीलेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर