रावेर, जि.जळगाव : गणपती पुळे येथे मुलाचा मान देण्यासाठी खाजगी वाहनाने आप्त व शेजारील परिवारासह श्री क्षेत्र माहूरगड, तुळजापूर मार्गे पंढरपूरला गेलेले येथील किशोर गोविंदा महाजन (वय ४७, रा.स्वामी विवेकानंद चौक,रावेर) हे चंद्रभागेवर स्नानासाठी गेले असता, लघुशंकेहून पाच मिनिटात आलोच असे सांगून गेल्यानंतर न परतल्याने ते गायब झाले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडलीे. त्यांचा पंढरपूर शहरात दोन दिवस शोध घेतला असता ते आढळले नाही. अखेर मान देण्याची तीर्थयात्रा अर्ध्यावर सोडूनच हा आप्तपरिवार रिकाम्या हाती आज घरी परतला आहे. यासंबंधी पंढरपूर पोलीसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.पांढरा शर्ट, चॉकलेट रंगाची पॅण्ट, रंग निमगोरा, सुदृढ बांधा, उंची साडेपाच फूट, बहिरेपणा असल्याचे त्यांचे वर्णन आहे. कुणालाही मिळून आल्यास पंढरपूर वा रावेर पोलीस स्टेशन (०२५८४ २५०३३३) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.दरम्यान, सदरचा आप्त व हितचिंतक परिवार मान देण्याची तीर्थयात्रा अर्ध्यावर सोडून रिकाम्या हाती आज घरी परतले असून कमालीचे हवालदिल झाले आहेत.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या तीरावरून रावेरचा ४७ वर्षीय प्रौढ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 15:03 IST
पंढरपूरला गेलेले येथील किशोर गोविंदा महाजन हे चंद्रभागेवर स्नानासाठी गेले असता, लघुशंकेहून पाच मिनिटात आलोच असे सांगून गेल्यानंतर न परतल्याने ते गायब झाले.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या तीरावरून रावेरचा ४७ वर्षीय प्रौढ गायब
ठळक मुद्देलघुशंकेसाठी गेलेले किशोर महाजन परतलेच नाहीतशोधण्यासाठी भटकंती करून हतबल झालेला आप्तपरिवार रिकाम्या हाती परतला