शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रावेरला बौद्धधम्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात ६४ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:09 IST

रावेर येथील फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेद्वारा रविवारी दुपारी आयोजित नवव्या सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजातील ६४ नववधू-वर जोडपी विवाहबंधनात अडकली.

ठळक मुद्देफुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय संस्थेच्या सामाजिक उपक्रमाला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसादसमाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थितीउल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव विवाह सामूहिक विवाह सोहळ्यातच करण्याचे आवाहन

रावेर, जि.जळगाव : येथील फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेद्वारा रविवारी दुपारी आयोजित नवव्या सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजातील ६४ नववधू-वर जोडपी विवाहबंधनात अडकली. पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांच्या आािण मान्यवरांच्या तथा बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शहरातील सरदार जी.जी.हायस्कूलच्या प्रांगणात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी नवदाम्पत्यांना त्रिशरण व पंचशील प्रदान केले. भारतीय बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष के.वाय.सुरवाडे, केंद्रीय शिक्षक सुमंगल अहिरे व शैलेंद्र जाधव यांनी बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, जयमंगलाष्कगाथेच्या धार्मिक मंगलविधीत नवदाम्पत्यांना विवाहबद्ध केले.राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्येक वधुवराला संसारोपयोगी वस्तू व अनुदान दिले जाते म्हणून समाजातील गरीब व गरजू व्यक्तींनी आपल्या मुला-मुलींचे विवाह सामूहिक विवाह सोहळ्यातच करण्याचे आवाहन संयोजकांनी मनोगतात केले.खासदार रक्षा खडसे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. दीपपूजन जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, भुसावळचे अ‍ॅड.राजेश झाल्टे, मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. धूपूजन दीपक नगरे, नगरसेवक जगदीश घेटे, नगरसेविका रंजना गजरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.समाजकल्याण विभागातर्फे अमोल तायडे व अनिल बोदडे उपस्थित होते.खासदार रक्षा खडसे, व भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. साहित्यिक जयसिंग वाघ, नगराध्यक्ष दारा मोहंमद, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, शीतल पाटील, माजी उपनगराध्यक्षा रंजना गजरे, दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेच्या सदस्या पुष्पा तायडे, समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख संतोष नरवाडे, राजू सवर्णे, उमेश गाढे, उत्तम प्रधान, अ‍ॅड.योगेश गजरे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी केले. सूत्रसंचालन नगीनदास इंगळे यांनी, तर आभार अ‍ॅड.योगेश गजरे यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर