रावेर/ऐनपूर, जि.जळगाव : तालुक्यातील ऐनपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता बाळू भिल्ल व उपसरपंच श्रीराम तुकाराम महाजन यांच्याविरुद्ध तेराही ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वासात घेत नाही व मनमानी कारभार करीत असल्याचे आरोपावरून त्यांच्यावर आता विश्वास राहिला नसल्याचे कारण स्पष्ट करून तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्याकडे सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.ऐनपूर ग्रामपंचायत सरपंच योगीता बाळू भिल्ल व उपसरपंच श्रीराम तुकाराम महाजन हे विश्वासात घेऊन काम करत नाहीत, विकासकामांत विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करीत आहेत, शासकीय योजनांची कोणतीही माहिती देत नाहीत व त्यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही या कारणावरून पंधरापैकी त्या दोघांखेरीज सर्व तेराही ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्याकडे ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे यांच्यासमक्ष विजय रामदास पाटील, गोकुळ श्रीराम पाटील, अनिल बाजीराव पाटील, शेख युसूफ शेख सांडू, सुनील लक्ष्मण खरे, परेश रवींद्र पाटील, मंदा रवींद्र महाजन, करूणा विकास अवसरमल, आशा नामदेव कोळी, मालती निवृत्ती महाजन, विद्या किरण महाजन, प्रियंका पंकज महाजन या तेराही ग्रामपंचायत सदस्यांनी स्वाक्षरी करून सरपंच योगीता भिल्ल व उपसरपंच श्रीराम तुकाराम महाजन यांच्याविरूद्ध स्वतंत्र दोन अविश्वास प्रस्ताव दाखल केले आहेत.
रावेर तालुक्यातील ऐनपूरचे सरपंच व उपसरपंचांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:48 IST
ऐनपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता बाळू भिल्ल व उपसरपंच श्रीराम तुकाराम महाजन यांच्याविरुद्ध तेराही ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वासात घेत नाही व मनमानी कारभार करीत असल्याचे आरोपावरून त्यांच्यावर आता विश्वास राहिला नसल्याचे कारण स्पष्ट करून तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्याकडे सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
रावेर तालुक्यातील ऐनपूरचे सरपंच व उपसरपंचांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल
ठळक मुद्दे ‘आमचा सरपंच-उपसरपंचांवर राहिला नाही विश्वास’१३ ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे दाखल केला प्रस्तावया अविश्वास प्रस्तावांसंदर्भात तारीख निश्चित करून या सप्ताहाभरात विशेष सभा