शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

रावेर लोकसभा : ‘कहो दिलसे रक्षा खडसे फिरसे’ ही साद मतदारांना भावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:52 IST

भुसावळ वगळता सर्वच मतदार संघात लाखावर मते

विलास बारीजळगाव : रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचे बुथनिहाय नियोजन आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा शेवटपर्यंत उमेदवार निश्चित करण्यासाठी चाललेला घोळ ही परिस्थिती पाहता भाजपचा विजय निश्चित मानला जात होता.राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे व्यक्तीमत्व असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजकीय विजनवासात आहेत.मात्र त्यांची आजही जिल्ह्यातील राजकारणावर मजबूत पकड असल्याचे या निकालाने सिद्ध झाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या गैरहजेरीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन व बुथरचनेची चांगल्याप्रकारे तयारी करीत एकहाती विजयश्री खेचून आणली.दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जागा कुणाला सोडावी यावरून एकमत होत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार निश्चित होत नव्हता.राष्ट्रवादीला अपेक्षित उमेदवार न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसला ही जागा सोडली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांना मतदार संघात प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही. भुसावळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहिले. अन्य शहरांमध्ये फारशी वेगळी परिस्थिती राहिली नाही.रावेर व यावल तालुका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्वच नसल्याने भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना एकहाती विजय मिळविता आला.लोकसभा निवडणुक घोषित झाली तेव्हाच विजय निश्चित होता. फक्त लिड कितीचा मिळतो याबाबत उत्सुकता होती, आणि हे सार्थ ठरले.विधानसभेचे गणित कसे राहील...?लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी शिवसेना व भाजपची युती कायम राहिल्यास रावेर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात शिवसेना व भाजपसाठी पोषक वातावरण राहणार आहे. युती झाल्यास मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना शिवसेनेचा फारसा विरोध राहणार नाही. तर भुसावळातील जागेवर शिवसेनेने आपला हक्क सांगितल्यास मात्र विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासाठी अडचणीची बाब ठरणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनादेखील विधानसभेसाठी आतापासून तयारी करावी लागणार आहे.विजयी उमेदवारांसमोरील आव्हाने काय?केळी या पिकांवर वारंवार पडणारा रोग व नुकसानीसाठी केंद्र शासनाकडून भरीव उपाययोजना करावी लागणारमेगा रिचार्ज प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून तो पूर्णत्वास आणावा लागणार आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रावेर लोकसभा मतदार संघात गंभीर आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव