शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रावेर : आपद्ग्रस्त केळी उत्पादक शेतकरी अद्याप वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 18:30 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यात ६६ गावांतील दोन हजार ३२४ शेतकºयांच्या दीड हजार हेक्टरमधील ११४.०५ कोटी रुपयांच्या केळीचे वादळी पावसाने नुकसान झाले होते. या घटनेस तब्बल चार महिने लोटले तरी सरकारने या शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

ठळक मुद्देयंदा पर्जन्यमानातील मोठमोठ्या खंडांसह सातत्याने अनियमितता राहिल्याने बारापैकी दहाही पर्जन्यन क्षेत्रात केवळ ७१. १४ टक्के पर्जन्यमान झाल्याने भूजलपातळी खालावून रब्बी व केळी बागायतीची धोक्याची घंटा वाजली आहे.तालुक्याच्या सुकी, मंगरूळ व आभोडा या मध्यमसिंचन प्रकल्पांखेरीज मात्राण व चिंचाटी लघुसिंचन प्रकल्प अद्यापही भरलेले नाही.केवळ एका तोकड्या पुराखेरीज नद्या नाल्यांनाही पूर न गेल्याने दुष्काळाचे भय या धरणांच्या तालुक्यातही आ’वासून असल्याने मायबाप सरकारने युद्धपातळीवर तातडीच्या उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.

किरण चौधरी ।रावेर, जि.जळगाव : तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ६६ गावांतील दोन हजार ३२४ शेतकºयांच्या दीड हजार हेक्टरमधील ११४.०५ कोटी रुपयांच्या केळीचे वादळी पावसाने नुकसान झाले होते. या घटनेस तब्बल चार महिने लोटले तरी सरकारने या शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.दरम्यान, हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील केळी उत्पादकांच्या देय संरक्षित विम्याची १०० कोटी रुपयांची रक्कम १५ सप्टेबरपर्यंत विमाधारक शेतकºयांना अदा करणे क्रमप्राप्त असताना सरकारच्या अधिपत्याखालील विमा कंपन्यांकडून कमालीची हयगय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.केळी करपा निर्र्मूलन पॅकेजवर सरकारच्या बेजबाबदार धोरणांचा करपा आल्याने केळीबागांवर करप्याने थैमान घातले असून, केळी बाजारभाव व्यवस्थापनातील अनागोंदी कारभारावर राज्य सरकारच्या पणन व सहकार मंत्रालयाचा वचक नसल्याने केळी उत्पादक शेतकरी उद्ध््वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा दौºयावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपेक्षित केळी उत्पादकांना आर्थिक न्याय देवून नैसर्गिक संकटात उभारी देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.संबंध देशभरातील केळी उत्पादनाच्या तीन चतुर्थांश केळी उत्पादन घेणाºया रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा या तालुक्यातील केळी उत्पादकांवर आघाडीच्या राजवटीपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकण व विदभार्तील ऊस, द्राक्ष, कांदा, आंबा, संत्री, मोसंबी उत्पादकांच्या तुलनेत आर्थिक अन्याय होत आल्याची केळी उत्पादकांची भावना असली तरी, महायुतीच्या आपल्या राजवटीतही केळी उत्पादकांचे लाड कौतुक तर सोडाच न्याय्य हक्कांचा आर्थिक न्याय केळी उत्पादकांना भेटू न शकल्याची खंत शेतकरी बांधवांमधून व्यक्त होत आहे.विशेषत्वाने मंत्रिमंडळातील आपले सर्वात निकटचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन जिल्ह्यातील असताना व त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून जूनच्या नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त केळीबागांची पाहणी करताना शेतकºयांची बाजू मांडणाºया विरोधी पक्षाचे पदाधिकाºयांना ताफ्यातून धक्का मारून बाहेर काढण्या पलीकडच्या राजकारणापलीकडे केळी उत्पादकांना झोळीत काहीच न टाकल्याने कमालीचा रोष व्यक्त होत आहे.त्याच वादळी पावसात जमीनदोस्त झालेल्या व फळपीक विमा नसलेल्या शेतकºयांनाही सरसकट प्रतिहेक्टरी एक लाख रुपये मदत तातडीने मंजूर करून लगतच्या मध्यप्रदेश सरकारने आपल्या राज्य सरकारपेक्षा एक पाऊल पुढे टाकले होते. त्या तुलनेत आपल्याकडील फळपीक विमा योजनेतील न्याय्यहक्काची संरक्षित विम्याची रक्कम १५ सप्टेबरपावेतो अदा करणे विमा कंपनीला बाध्य असतानाही संबंधित विमा कंपनी हयगय करीत असताना राज्य वा केंद्र सरकारकडून विमा कंपनीवर कारवाई होत नसल्याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या रेंगाळलेल्या कर्जमाफी योजनेमुळे बहुतांशी केळी उत्पादकांना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील विमा हप्ता भरणे दुरापास्त ठरल्याने विमाधारक नसलेल्या आपद्ग्रस्त केळी उत्पादकांच्या ११४.०५ कोटी रुपये पीक नुकसानीचे पंचनामे तब्बल चार महिन्यांपासून लालफितीत धुळखात पडून असल्याने विमाधारक नसलेले शेतकरी अद्याप वाºयावर सोडल्याची विदारक परिस्थिती आहे.आपले प्रतिनिधी म्हणून आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सरसकट प्रतिहेक्टरी एक लाख रुपये मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन पाहणी दौºयात दिले होते. मात्र, त्यासंबंधी कमालीची अनास्था शासनाकडून दाखवली जात असल्याने कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.केळी खरेदीसाठी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केळी भाव समितीकडून प्रतिक्विंटल एक हजार १२० रुपये भाव घोषित होत असला तरी गुणात्मक दर्जाचा बहाणा करून व्यापारी मग तो परवानाधारक असो की नसो, तो सर्रास ५०० ते ६०० रू क्विंटलप्रमाणे निम्मे भावात केळी खरेदी करून किमान ३५ ते ४० टक्के नफेखोरी कमावण्याची मनमानी करीत आहे.बाजार समित्या केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. तत्संबंधी गांभीर्याने दखल घेऊन केळी बाजारभाव व्यवस्थापनावर पणन व सहकार विभागाचा अंकुश ठेवून व्यापाºयांच्या मनमानीवर निर्बंध घालण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, केळीला फळाचा दर्जा देणे व नाशवंत केळीला टिकाऊपणा प्राप्त करण्यासाठी आपण घोषित केलेल्या रेडीएशन प्लँटचा प्रश्न अडगळीत पडून असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर