शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

रावेरला कारमधील गॅस गळतीमुळे ‘बर्निंग कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:13 IST

रावेर शहरातील कैलास दयालदास वाणी यांच्या मुलाच्या उभ्या असलेल्या कारने शुक्रवारी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामुळे ही ‘बर्निंग कार’ पालिकेचा अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झाली.

ठळक मुद्देअग्निशमन दलाचा बंब पोहोचण्यापूर्वीच कार आगीत भस्मसातआग विझवताना दोन जण जखमीकारमधील सायरन वाजताच धावले अनेक जण मदतीसाठी

रावेर, जि.जळगाव : शहरातील डॉ.पी.टी. पाटील यांच्या हॉस्पिटलच्या पाठीमागील कैलास दयालदास वाणी यांच्या मुलाच्या उभ्या असलेल्या कारने शुक्रवारी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामुळे ही ‘बर्निंग कार’ पालिकेचा अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झाली. आजच्या अतिउष्ण तापमानामुळे सदर कारमधील गॅसकिटमधून ज्वलनशील गॅसची हळूहळू गळती होऊन अकस्मात आगीने भडका घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले.सदर कारने पेट घेताच आगीचा धोका दर्शवण्यासाठी कारमधील सायर वाजल्याने घराघरातून अनेकांनी मदतीचा हात देण्यासाठी धाव घेतली. काही क्षणात अग्निशमन दलाचा बंब पोहोचण्यापूर्वीच सदरची बर्निंग कार आगीत भस्मसात झाली.तत्पूर्वी सदर आग विझवताना कैलास वाणी यांचा मुलगा व नातूस गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. रावेर अग्निशामक दलाचे धोंडू वाणी, विजय महाजन, दीपक महाजन आदींनी आग नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घेतले. यासंदर्भात रावेर पोलिसात कोणतीही नोंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :fireआगRaverरावेर