खिर्डी, ता. रावेर : रेनबो स्पायडर हा अत्यंत सुंदर दुर्मीळ व लहान प्रजातीचा कोळी (कीटक) असून खान्देशात भुसावळजवळील हतनूर परिसरातील गावात हा कोळी आढळला आहे.
या किटकावरील विविध रंगछटांमुळे त्याला या नावाने संबोधित करण्यात आले आहे. या कोळ्याचा अठराव्या शतकानंतर म्हणजे सुमारे तब्बल दीडशे वर्षांनी या प्रजातीचा पुनर्शोध लागला होता. त्याआधी ही प्रजाती जगातून लुप्त झाली की काय, असा समज होता. खान्देशातील हतनूर धरणाजवळील टहाकळी गावात या प्रजातीची नोंद झाल्याने खान्देशातील वन्यजीव विविधतेत अजून भर पडली आहे. ही नोंद वन्यजीवप्रेमी व चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य सौरभ अनिल महाजन यांनी घेतली आहे. सौरभ हे हतनूर धरण परिसरात निरीक्षण करताना या प्रजातीचा नर कोळी आढळून आला.
जैवविविधता जोपासण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या जैवविविधतेत रस घेऊन काम करण्याची गरज आहे, असे सौरभ महाजन यांनी म्हटले आहे.
फोटो
१४ एचएसके ३ व ४