शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अडथळ््यांची शर्यत..... विविध योजनांच्या बोझामुळे प्रकल्पांच्या निधीत कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 11:40 IST

निम्न तापीसाठी गेल्या वर्षी तरतूद केलेल्या निधीत ३० टक्के कपात

जळगाव : दुष्काळी अनुदान, शेतकरी कर्जमाफी अशा योजनांमुळे आर्थिक बोझा वाढल्याने राज्य सरकारकडून प्रकल्पांच्या निधीमध्ये कपात केली जात आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील निम्न तापीसाठी गेल्या वर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३२ कोटी ५ लाखाच्या निधीतून ३० टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे.जळगाव जिल्ह्यात सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी मेगा रिचार्ज प्रकल्प प्रस्तावित या सोबतच निम्न तापी प्रकल्प, भागपूर उपसा सिंचन योजना, वरखेड लोंढे प्रकल्प, शेळगाव बॅरेज, बोदवड परिसर उपसा सिंचन योजना अशा विविध योजना कार्यान्वित आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. त्यानुसार जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.आर्थिक बोझ्याने ३० टक्के कपातगेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात निम्न तापीसाठी ३२ कोटी ५ लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर दुष्काळी अनुदान, शेतकरी कर्जमाफी अशा योजनांमुळे आर्थिक बोझा वाढल्याने राज्य सरकारने या निधीवरच गडांतर आणल्याची माहिती सूत्रांनी दिली. निम्न तापीच्या या तरतूद निधीतून ३० टक्के रक्कम कपात केली होती. त्यामुळे यंदादेखील ४० कोटींची तरतूद केली आहे, ती तरी पूर्ण मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा तरतूद होते, मात्र निधी मिळण्याची शाश्वती काय? असाच सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.या प्रकल्पासाठी मार्च २०१९ अखेरपर्यंत ४६९ कोटी दोन लाख ७० हजार रुपये खर्च झालेले आहेत. त्यानंतर आता उर्वरित कामासाठी २३०० कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे यासाठी किमान दरवर्षी २०० कोटींचा निधी मिळणे गरजेचा आहे. त्यात यंदादेखील केवळ ४० कोटी रुपयेच मिळाले म्हणजे २१६० कोटीची भर कशी निघणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यात या वर्षाच्या २१६० कोटीमध्ये पुढील वर्षी ६ ते ७ टक्क्यांच्या वाढीव किंमतीची भर पडणार असल्याने हा निधी कसा उपलब्ध करणार, असेही प्रश्न आहेच.मोठ्या योजनांमध्ये समावेश केल्यास गतीनिम्न तापी प्रकल्पाचा समावेश बळीराजा संजीवनी योजना अथवा प्रधानमंत्री सिंचाई योजनेत केल्यास या प्रकल्पाला केंद्राकडूनही निधी मिळून त्यास गती येईल, असे जाणकार सांगत आहे. असे झाल्यास हा प्रकल्प वेग घेईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव