शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:38 IST

रानडुकराने केलेल्या हल्ल्यात बापूराव सर्जेराव पवार (५०) हे शेतकरी जखमी झाल्याची घटना सातगाव डोंगरी येथे ३ रोजी घडली.

ठळक मुद्देशेतकरी जखमीपाचोरा नंतर जळगावी हलविलेझाडाझुडपांमध्ये रानडुकरे

सातगाव डोंगरी, ता.पाचोरा, जि.जळगाव : रानडुकराने केलेल्या हल्ल्यात बापूराव सर्जेराव पवार (५०) हे शेतकरी जखमी झाल्याची घटना सातगाव डोंगरी येथे ३ रोजी घडली. या घटनेत शेतकºयाने समयसूचकता दाखविल्याने बालंबाल बचावले.शेतकरी बापूराव पवार हे सातगाव शिवारातील स्वत:च्या शेतामध्ये दुपारच्या दीड वाजेच्या दरम्यान एकटेच काम करीत होते. तेव्हा शेजारील दादरच्या (ज्वारी) शेतातून रानडुकराने पवार यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यांच्या मांडीला रानडुकराने चावा घेतला. एकामागून एक अशा तीन ठोसा रानडुकराने मारल्या. चौथी ठोस मारण्याच्या प्रयत्नात असताना, पवार यांनी समयसुचकतेने शिवाय त्यांची उंची चांगली असल्याने एक पाय वर केला. त्यावेळी जोरात आलेले रानडुक्कर त्यांच्या पायाखालून निघून गेले. ते परत शेतकºयाकडे आले नाही. त्यामुळे ते बालंबाल वाचले. रानडुक्कर निघून गेल्यावर पवार यांनी आरडाओरडा केली. तेव्हा आजूबाजूचे शेतकरी धावत आले. सुरुवातीला त्यांना पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे संबंधित इंजेक्शन नसल्याने जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून उपचार घेऊन, त्यांना पाचोरा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. सदर घटना वनपाल एस.टी. भिलावे यांना कळविण्यात आली. भिलावे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जखमी शेतकºयाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.परिसरातील शेतकºयांच्या म्हणण्यानुसार, अशी बरीच रानडुकरे जंगलात असून, झाडाझुडपांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. सदर परिसर अजिंठा पर्वताच्या जवळच असल्याने, शिवाय डोंगरात पाणी नसल्याने, ज्या ठिकाणी शेतकºयांनी स्वत:च्या गुरांसाठी सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी ठेवलेले आहे. हेच पाणी पिण्यासाठी डोंगरातून ही रानडुकरे व इतर प्राणी येत असतात. त्यामुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने अशा प्राण्यांच्या भीतीपासून शेतकºयांचे संरक्षण करावे, अशीही मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPachoraपाचोरा