भुसावळ, जि. जळगाव, दि. 17 - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे नवीन डीआरएम म्हणून (विभागीय व्यवस्थापक) रामकुमार यादव यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मावळते डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा उपस्थित होते. सुधीरकुमार गुप्ता येथून गुरुवारी 20 रोजी त्यांच्या नवीन सिनिअर डीजीएम (बिलासपूर) पदावर रुजू होण्यासाठी रवाना होतील.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग डीआरएमपदी रामकुमार यादव
By admin | Updated: April 17, 2017 16:14 IST