शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : सावरकर गौरव यात्रेच्या समारोपासाठी उद्या रॅली,अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 18:27 IST

भाजप-शिवसेनेच्यावतीने ३० मार्चपासून सावरकर गौरव राज्यव्यापी यात्रा काढण्यात आली आहे.

कुंदन पाटील

जळगाव - भाजप-शिवसेनेच्यावतीने ३० मार्चपासून सावरकर गौरव राज्यव्यापी यात्रा काढण्यात आली आहे. दि.६ रोजी भाजपचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने शहरातून सावरकर गौरव रॅली काढून तिचा समारोप करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी दिली.

भाजपच्या ‘वसंत-स्मृती’ कार्यालयात त्यांनी ही माहिती पत्रकारांन दिली. या रॅलीचा भाजप कार्यालयापासून प्रारंभ होणार आहे. सुभाष चौक, चित्रा चौकमार्गे सावरकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता होणार आहे. प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, सरचिटणीस संजय उपाध्याय, मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेश पाटील, आमदार जयकुमार रावल, संजय सावकारे, मंगेश चव्हाण,  महामंत्री विजय चौधरी, दीपक सुर्यवंशी, पी.सी.पाटील, नंदू महाजन, प्रल्हाद पाटील, के.बी.पाटील, राकेश पाटील, सचीन पानपाटील, हर्षल पाटील आदी रॅलीच्या सांगतावेळी उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर

दरम्यान, दि.१० रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत मेळाव्यासह विविध शाखांचे उद्‌घाटन तसेच काहींचे पक्ष प्रवेश होणार आहे. या दौऱ्यात बावनकुळे काही जणांच्या भेटीही घेणार असल्याचे भोळे यांनी सांगितले.

तर ठेकेदारच जबाबदार

विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांसह काही कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. मात्र या रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. दर्जा नसलेल्या कामांविषयी यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत. तरीही दखल न घेणारे ठेकेदार सध्या क्षणिक सुखात आहेत. मात्र शासन आदेशानुसार रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराला आगामी पाच वर्ष रस्त्याची निगा राखावी लागणार आहे, हे त्यांनी विसरु नये. यासंदर्भात वेळोवेळी नक्कीच पाठपुरावा करु, असे भोळे यांनी सांगितले.

आयुक्तांनी दौरा करावा

शहरातील कुठला रस्ता खराब आहे, याची चाचपणी करण्यासाठी स्वत: मनपा आयुक्तांनी दौरा करावा, तपासणी करावी.सध्या मनपा कर्जमुक्त आहे. त्यामुळे रस्त्यांसह अन्य विकास कामांसाठी मनपा आयुक्तांनी स्वत:च पुढाकारा घ्यावा, असे आवाहन भोळे यांनी यावेळी केले.