अमळनेर : चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यासाठी राजमुद्रा फाउंडेशन व संभाजी ब्रिगेडच्यावतीने जीवनावश्यक ३५० किट चिपळूण आणि महाड परिसरात पाठवल्या होत्या. ते तेथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वितरित केले.
कोकण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले आणि अशावेळी अडचणीत आलेल्या महिलांना मदत आणि सहकार्य करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याची जाणीव ठेवून चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यासाठी राजमुद्रा फाउंडेशन व संभाजी ब्रिगेडच्यावतीने परिसरातील नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
युवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करत चांगला प्रतिसाद दिला. संकलन करण्यात आलेली मदत एकत्रित करून ३५० जीवनावश्यक किट तयार करण्यात आले होते. ही मदत चिपळूण शहर व परिसरात स्थानिक संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नागरिकांना वाटण्यात आली. या कार्यात राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्याम पाटील, अनिल बोरसे, विजय चव्हाण, किरण पाटील, किरण सूर्यवंशी, अक्षय चव्हाण, भूषण भदाणे, तेजस पवार, तुषार वायकर, विशाल पाटील, उज्ज्वल मोरे, अक्षय पाटील, निनाद शिसोदे, राज सूर्यवंशी, खिलेश पवार, कुणाल पाटील, किशोर पाटील, सारंग लोहार, राहुल पाटील, गौरव पवार, अमोल पाटील, वरूण बेहेरे, दर्पण वाघ, मयूर पाटील, अनिरुद्ध शिसोदे, शुभम देशमुख, आकाश पवार, भावेश जैन, प्रसन्न जैन, भूषण सोनवणे, दिशांत पाटील, उमेश पाटील, सुमित पाटील आदींचे सहकार्य लाभले.