स्वातंत्र्यपूर्व काळापासून इंदूर येथील नावाजलेल्या घराण्यांपैकी बापना हे घराणे असून उद्योगक्षेत्रात भरारी घेत राजेंद्रसिंह बापना यांनी आणखी मोठी ओळख निर्माण केली. उद्योगक्षेत्रात मोेठे नाव असलेल्या राजेंद्रसिंह यांनी २७ रोजी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला बापना, मुलगा उपेंद्र बापना, सून, नातवंडे असा परिवार आहे. बापना यांचे सुपूत्र उपेंद्र बापना यांनी अमेरिकेत शिक्षण घेत ते तेथेच स्थायिक झाले. मात्र राजेंद्रसिंह बापना यांच्या मृत्यूसमयी ते वडिलांसोबतच होते.
राजेंद्रसिंह बापना हे लोकमत वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांचे साडू तर माजी मंत्री सुरेशदादा जैन व जळगाव महापालिकेचे माजी महापौर रमेशदादा जैन यांचे ते मेहुणे होत.
बापना यांचे आजोबा सिरेमल बापना हे स्वातंत्र्यपूर्व काळात होळकर संस्थानचे पंतप्रधान होते तर वडील प्रतापसिंह बापना हे मध्यप्रदेशातील उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी होते. भोपाळ राजधानी झाल्यानंतर या शहराच्या विकासात त्यांचा मोठा हातभार होता.